✍🏻 लेखनकट्टा
_आपल्या लेखणीला बनवा अजून धारदार...✒_मैत्रीण....
एक मैत्रीण असावी,
मैत्रीची बंध असलेली,
नात्यात दुरावा असूनही,
मनाच्या कप्प्यात वसलेली......!!१!!
सारंकाही मैत्रीतलं,
अभंग, अतूट असावं,
त्यातील जाणिवेत,
आपलेपण दिसावं......!!२!!
सारंकाही मैत्रीण म्हणून,
जाणून घ्यावे आपुलकीने,
चूक होता काही अनावधानाने,
कान ओढावे सलगीने.....!!३!!
मैत्रीण असावी एकतरी,
जीवाला जीव देणारी,
साऱ्यांनी पाठ फिरवली तरी,
अखेरपर्यंत साथ देणारी. .....!!४!!
मैत्रीण असावी एकतरी,,,,,!
*✍लेखन: अनिल जे. पावरा*
https://aniljpawara18.blogspot.com/
*📍आपल्यालाही लिहायचंय...*
👉 http://myinfokey.in/लेखनकट्टा/
1 Comments
Very Good Sir
ReplyDelete