अस्तंभा हे सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर असुन ते सातपुड्याच्या 4 थ्या रांगेत आहे. सातपुडा पर्वत रांगेत नंदुरबार जिल्ह्यात तळोदा/धडगाव तालुक्यातील उंच शिखर अस्तंबा ऋषी हे ऐतिहासिक ठिकाण आहे येथे गुफा आहेत. दुर्मिळ लेण्याही आहेत या ठिकाणी दरवर्षी धनयत्रोदशीला (दिवाळीला)यात्रा भरते..हजारोच्या संख्येने भाविक-भक्त या उंच शिखरावर दर्शनाला येतात...
याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 1,325 मीटर म्हणजे = 4,347.11 फूट उंच आहे.(काही पुस्तकांत मात्र 4,500 फूट म्हणजे = 1,371.6 मीटर असे आहे). सातपुडा पर्वत रांगेत नंदुरबार जिल्ह्यात तळोदा/धडगाव तालुक्यातील उंच शिखर अस्तंबा ऋषी हे ऐतिहासिक ठिकाण आहे येथे गुफा आहेत. दुर्मिळ लेण्याही आहेत या ठिकाणी दरवर्षी धनयत्रोदशीला (दिवाळीला)यात्रा भरते..
हजारोच्या संख्येने भाविक-भक्त या उंच शिखरावर दर्शनाला येतात...
याचे गणित आपण निट समजुन घेऊ.. 4,500 फूट म्हणजे = 1,371.6 मीटर आहे. 1,325 मीटर = 1.325 कि.मी. असे आहे. अस्तंभा हे गांव एतिहासिक व धार्मिक स्थळ आहे. येथे शिखरावर चढण्यासाठी खूप अरुंद व जीवघेणी अशी पायवाट असतांनाही नंदुरबार जिल्हा व गुजरात परिसरातील आदिवासी भाविक मोठ्या ऊत्साहाने चढून दर्शन घेतात हे विशेष. माथ्यावर पोहोचल्यावर येथील जगावेगळी अल्हाददायक थंड हवेच्या प्रसन्नतेने मनुष्य सुखावतो. येथील एक विशेष म्हणजे शिखरावर कितीही लोक गेले तरी सर्व भाविकांना दर्शनासाठी व बसण्यासाठी जागा उपलब्ध होतेच. धनत्रयोदशीच्या दिवशी शिखराच्या पायथ्याशी भव्य यात्रा भरते. आणि याच दिवशी लाखो भाविक चढायला सुरुवात करतात. दिपावली च्या दिवशी मुख्य यात्रा असते. रात्री सोंगाड्या पार्टीचे आयोजन केले जाते. तसेच भाविक आपले नवस पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या वेष भूषेत येतात. नाच गाण्याची सोंगाड्या पार्टीची मुहूर्तमेढ येथूनच होते. दर्शनाला आलेले भाविक नसिबाचा भाग म्हणून रोश्या गवत घेऊन जातात. सात चिरंजीवातील एक अश्वस्थामा हे आहे. श्रापीत अवस्थेत कपाळा वरिल भळभळणारी जखमेच्या थंडाव्यासाठी ते वणवण हिंडत होता. अखेर त्यांना आदिवासी देवता राजा पांठा व गांडा ठाकूर ने या शिखरावर आश्रय घेण्याची समंती दिली. ते चिरंजीव असल्यामुळे तेथे स्त्रीया यात्रेला जात नाही. ते याच शिखरावर वास्तव्याला आहे. असे आपल्या समाजातील व भागांतील जाणकार सांगतात.
अस्तंभा शिखरातील प्रमुख ठिकाणे:
1)स्थानक
2)ऊंगोलकुंड(भिम कुंड)
3)डाकीन दगड
4)हाकडो थेवो
5)मुख्य शिखर(देव स्थानक)
6) झुला
7)गांड गिसरी
8)मामा - भांजा
वरिल प्रमुख मुख्य ठिकाणे आहे. अजुन तेथे बघण्यासाठी विविध ठिकाणे आहेत.तेथे डोंगरावर गेल्यावर आसपासच्या जिल्ह्याचा नजारा खुपसुंदर दिसते.ट्रेकिंग करणार्यांनसाठी ते एकआकर्षक असे ठिकाण आहे..
8 Comments
Very good information
ReplyDeleteNice information
ReplyDeleteGood information
ReplyDelete👌👍
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeletegoog to know about it
ReplyDeleteSuper
ReplyDeleteWrong information,
ReplyDelete