एकीकडे सातपुड्यातील जिल्हा परिषद शाळा ह्या बंद अव्यस्थेत असतांना मात्र दुसरीकडे जिल्हा परिषद शाळा काल्लेखेतपाडा येथे शिक्षक अनेक उपक्रम राबवून आपल्या शाळेचे नाव उचांवत आहे..
नंदुरबार जिल्हा आदिवासी असूनसूद्धा येथील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावला नाही. असा संदेश देणारी उपक्रमशील शाळा म्हणजे अतिदुर्गम धडगांव तालुक्यातील उमराणी बु! गावातील काल्लेखेतपाडा येथील जिल्हा परिषदेची शाळा होय.
या शाळेत मुख्याध्यापक श्री.रुपेशकुमार दिगंबर नागलगावे तसेच सहशिक्षक श्री.दशरथ पावरा, श्री. तेगा पावरा, श्री लक्ष्मीपुञ उप्पीन या शिक्षकांद्वारे शिक्षणासाठी सतत अभिनव उपक्रम राबविले जातात. त्यामुळे ही शाळा शैक्षणिक दर्जासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रगण्य मानली जात आहे.
काल्लेखेतपाडा या गावातील गावकरी देखील शाळेच्या विकासकामात व विद्यार्थी घडविणाऱ्या सर्व उपक्रमामध्ये सहभागी होतात. त्यामुळे सन 2012 पासून हि शाळा अनेक उपक्रमात तालुका स्तरावर ही शाळा प्रथम क्रमांक पटकावित आहे.
येथे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच त्यांचे सामान्य ज्ञान, आवडी निवडी व छंद जोपासल्या जातात. त्याकरीता एकलव्य ज्ञानवर्धीनी सामान्य ज्ञान स्पर्धा, ग्रामगीत संस्कृती ज्ञान परीक्षा, चित्रकला स्पर्धा तसेच अविष्कार या मासिकातून विद्यार्थ्यांचे अनेक कलागुणांना वाव मिळत आहे..इत्यादीचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न नागरिक घडवित आहे. तसेच गावातील सामाजिक संस्था शारदाई फाऊंडेशन मार्फत सुद्धा अनेक उपक्रम घेतले जातात. तसेच विद्यार्थ्याकरीता गणवेश व शालेयपयोगी साहित्य हे वाटप केले जाते.त्याचप्रमाणे फाऊंडेशन मार्फत मोफत शारीरिक तपासणी सुद्धा केली जाते.बौद्धिक व शारीरिक विकासासाठी आवश्यक त्या वस्तू विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला चालना मिळाली आहे.
सामान्य ज्ञान स्पर्धा, प्रश्न मंजुषा, तारखेचे महत्व सांगणारा पाढा, बालसभा यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमासोबतच शाळा संगणकीय शिक्षणाच्या दृष्टीनेही परिपूर्ण आहे.
अशाप्रकारे ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालकसंघ व गावकऱ्यांच्या सहकार्याने ही शाळा विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासोबतच त्यांच्या प्रगतीपथाकडे लक्ष देऊन आहे.
#Anil J Pawara
0 Comments