ABOUT ME माझ्याबद्दल

      
                 
Anil J Pawara









माझ्याबद्दल

नमस्कार मित्रहो,

मी अनिल जे पावरा, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्याचा रहिवासी.

मी एक Marathi Writer, Blogger, संशोधक (Researcher) आणि वाचक आहे. लेखन, वाचन, पुस्तकं, सिनेमा आणि समाज यांचा परस्पर संबंध शोधणं हा माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे.

शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास (My Journey)

मी M.A. (English) आणि B.Ed. (English & History) शिक्षण पूर्ण केले असून, काही काळ English विषयाचा Assistant Professor म्हणूनही कार्य केले आहे. अध्यापनाच्या माध्यमातून मला साहित्य, विचार आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.

सध्या मी ZP Sangli येथे Grampanchayat Adhikari म्हणून कार्यरत आहे. या प्रशासकीय भूमिकेमुळे मला ग्रामीण भारत, स्थानिक प्रशासन, सामाजिक वास्तव आणि सामान्य माणसांच्या समस्या जवळून पाहता व समजून घेता येतात. हीच अनुभवसंपन्नता माझ्या लेखनाला अधिक वास्तववादी बनवते.

संशोधन आणि वैचारिक वाटचाल

मी English Literature मध्ये संशोधक असून माझं संशोधन मुख्यतः Tribal Studies, Displacement, Subaltern Literature या विषयांवर केंद्रित आहे.


लेखन आणि ब्लॉगिंग प्रवास

मी एक लेखनप्रेमी आणि वाचनप्रेमी माणूस आहे.

माझं लेखन फार अलंकारिक नसतं, पण ते मनापासून, अनुभवातून आणि वास्तवातून आलेलं असतं.

या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळतील:

मराठी वैचारिक लेख

कविता आणि चारोळ्या

उपरोधिक व सामाजिक लेखन

आदिवासी प्रश्न, विस्थापन, साहित्य आणि जीवनदर्शन

कधी कागदावरून मनात उतरलेले विचार लिहितो, तर कधी मनातले विचार थेट कागदावर उतरतात..


आयुष्याबद्दल माझा दृष्टिकोन

माझा ठाम विश्वास आहे की—

आयुष्य किती आहे यापेक्षा, ते कसं जगलं जातं हे जास्त महत्त्वाचं आहे.


जोपर्यंत एखादी गोष्ट मनाला आनंद देते, तोपर्यंत ती मनापासून स्वीकारावी. आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात, काही क्षणभर सोबत असतात आणि नकळत निघून जातात. म्हणून आयुष्य सुंदर बनवण्यासाठी ध्येय, माणुसकी आणि संवेदनशीलता आवश्यक आहे.


हा ब्लॉग का वाचावा?


हा ब्लॉग मी सुरू केला आहे कारण—

मराठी भाषेत विचार मांडण्यासाठी

साहित्य, समाज आणि प्रशासन यांचा सेतू बांधण्यासाठी

आदिवासी व सबाल्टर्न आवाज अधोरेखित करण्यासाठी

वाचकांशी थेट आणि प्रामाणिक संवाद साधण्यासाठी


माझ्याशी संपर्क साधा

तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आणि मतं माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत.

📧 Email: aniliofficial@gmail.com

Post a Comment

4 Comments