चैतन्यदायी नववर्ष यावे....
किती सोसले किती भोगले
सुख-दुःखाचे क्षण राहून गेले
काही सांगायचे काही बोलायचे
शब्दच काही राहून गेले...
सुख-दुःखाचे क्षण राहून गेले
काही सांगायचे काही बोलायचे
शब्दच काही राहून गेले...
काही परके काही आपले
या जगातून निघून गेले
कोण आपले कोण परके
हे मात्र समजावून गेले...
क्षण सुखाचे रेंगाळावे
अन दुःखाचे निघुनी जावे
नाही थांबत काळ तसाही
कालचक्र ते फिरत राही...
अनेक आठवणी जाग्या झाल्या
पहाटे स्वप्नात येऊन गेल्या
सर्व काही चांगले होईल
ही आशा मज देऊन गेल्या...
भले बुरे ते विसरून जावे
आनंदी लाटांना उधान यावे
अपूर्ण गोष्टींना पूर्णत्व मिळावे
चैतन्यदायी नववर्ष यावे....
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙌🏻🙏🏻
1 Comments
Happy new year sir
ReplyDelete