'भालाफेक'मध्ये भारताला पहिलं वहिलं सुवर्ण पदक मिळवून देणा-या 'निरज चोप्रा'चा टोकीयोत धमाका🥇
भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा याच्या खेळीकडं भारताच्या नजरा लागल्या होत्या. करोडो भारतीयांचं स्वप्न नीरजनं पूर्ण करत टोकियो ऑलम्पिकमधील पहिलं सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. पहिल्या राऊंडमध्ये 87.03 मीटर लांब भाला फेक करत त्यानं आघाडी मिळवली.
नीरज चोप्रा भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देतो का याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं, अखेर करोडो भारतीयांचं स्वप्न नीरज चोप्रानं पूर्ण केलं आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये नीरज चोप्रानं 87.58 मीटर एवढ्याअंतरावर थ्रो फेकला आहे.पहिल्या दोन फेऱ्यांपासून नीरज चोप्रा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्रानं फेकलेल्या थ्रोची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.
1 Comments
jai hind
ReplyDelete