क्रांतिवीर जननायक तंट्या मामा भिल स्मृतिदिन निमित्ताने जि.प.शाळा काल्लेखेतपाडा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला...
धडगाव - शारदाई फॉउन्डेशन उमराणी ब्रु, तर्फे आदिवासी रॉबिनहूड क्रांतीवीर जननायक तंट्या मामा भिल स्मृतिदिन निमित्ताने जि.प.शाळा काल्लेखेतपाडा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले..यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालसंसद कु. मोगी पावरा, प्रमुख पाहुणे तेजस्विनी महिला आर्थिक विकास महामंडळ धडगावचे व्यवस्थापक राजु पराडके, सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश्वर पावरा, शारदाई फॉउन्डेशनचे संस्थापक श्री. जगदिश एल. पावरा हे उपस्थित होते.....
यावेळी बालसंसद मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जननायक तंट्या मामा भिल यांच्या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले..... पर्यावरण व जलसंवर्धन तसेच स्वच्छता बद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने तेजस्विनी महिला आर्थिक विकास महामंडळ धडगाव यांच्या मार्फत विध्यार्थ्यांना दीडशे कापडी पिशव्या वाटप करण्यात आले......
यावेळी शाळेतील बालसंसद उपमुख्यमंत्री मनिषा पावरा हिने जननायक तंट्या मामा भिल यांच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी तंट्या मामा यांनी केलेल्या योगदाना बद्दल विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त केले... यावेळी तेजस्विनी महिला आर्थिक विकास महामंडळ धडगावचे व्यवस्थापक राजु पराडके यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले, शालेय विद्यार्थ्यांवर पर्यावरण रक्षण व संर्वधनाचे संस्कार केल्यास भविष्यात चांगले पर्यावरण निर्माण होईल....
शारदाई फॉउन्डेशनचे अध्यक्ष श्री. जगदिश पावरा यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले शालेय विद्यार्थ्यांना वाटप केली गेलेली ही कापडी पिशवी प्रत्येक घरात पर्यावरण रक्षणाचा संदेश उत्तमरित्या पोहोचवेल व कापडी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृती होणे काळाची गरज आहे, यामुळे प्रदूषणमुक्त वातावरण व लोकांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले...
मुख्याध्यापक रुपेशकुमार नागलगावे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले समाजात आदिवासी तंट्या भिल्ल तसेच मामा म्हणुन संबोधले जाणारे क्रांतीवीर जननायक तंट्यामामा भिल्ल यांनी स्वातंत्र्य चळवळीत,जल, जंगल,जमीन यासाठी ब्रिटिश सत्तेविरुध्द संघर्ष उभा केला गेला अशा संघर्षात नेतृत्व करणारे जननायक तंट्यामामा भिल्ल यांचे स्थान महत्वपुर्ण आहे म्हणुन समाजातील क्रांतिवीराचे देशासाठी केलेले बलिदान व्यर्थ जाऊ नये तसेच येणारी पिढीला क्रांतिवीरची योगदानाबद्दल माहिती व्हायला पाहिजे असे म्हटले, यावेळी उपस्थितीत - सहशिक्षक तेगा पावरा,लक्ष्मीपुत्र उप्पीन दशरथ पावरा, जनार्थसेवा बालमित्र जितेंद्र पावरा...#जयआदिवासी
#जयबिरसामुंडा
3 Comments
Nice jay aadivasi
ReplyDeleteजय आदिवासी
ReplyDeleteJay aadivasi
ReplyDelete