जननायक बिरसा मुंडा यांच्या 15 नोव्हेंबर 2020 मधील 145 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व करमी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला.त्यांचे जन्मगाव उलिहातू हे रांचीजवळ आहे.
तो काळ पारतंत्र्याच्या होता.संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते.जंगलात राहणारे आदिवासी या गुलामगिरीतून वाचले नव्हते. इंग्रजांनी वन-कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता, त्यामुळे आदिवासींचा इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता...
1894 साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला.उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले.तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यावर अवाजवी शेतसारा लावला होता.याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जनआंदोलन केले.यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने 1895 मध्ये बिरसा मुंडा याना दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले.याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारला. "उलगुलान" म्हणजे एकाचवेळी सर्वांगीण उठाव.
1898 नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्राध्वारे अनेक लढाया केल्या. ब्रिटिशांना जेरीस आणले; परन्तु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्रापुढे व मोठ्या सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही...
1898 मध्ये एक नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले.आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले. त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले.ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले. त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार यांच्या विरोधातही बंड पुकारले.त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो.त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्रलढ्याच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे.
सन 1900 मध्ये बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असतांना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला.त्या ठिकाणी भीषण लढाई झाली.बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली.तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले.त्यामुळे 9 जून 1900 रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली.भारतीय स्वातंत्रलढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले.
या वीराने आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी मोठा लढा दिला.त्यामुळे लोकांनी त्यांना "जननायक"हा किताब बहाल केला...
या महान आदिवासी क्रांतिकारकास त्यांचा 15 नोव्हेंबर 2020 मध्ये 145 वी जयंती निमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन 🏹🏹🏹
जय आदिवासी जय बिरसा मुंडा
The man who set an Example to people during British Colonial Rule that Age dosen't matter, Activism Matters!
Remembering Freedom Fighter and Tribal Leader- Right to Land Activist #BrisaMunda on his Jayanti
#धरती_आबा_बिरसा_मुंडा
2 Comments
जय आदिवासी 🗡️🏹जय बिरसा मुंडा
ReplyDelete🏹⚔️जय आदिवासी.... जय बिरसा🚩🚩
ReplyDelete