दिशाहीन तरूण
दिशाहिन तारुण्याला..
दाखवा हो कुणी रस्ता..
अमृतमयी जीवनाला..
वैफल्य ग्रासलेय नुसता..
हातात त्यांच्या आलं..
इटुकल 'मोबाईल'..
इवल्याशा बोटाने..
मारतो नवी स्टाईल..
नादी लागून 'मोबाईल'च्या..
तरुण झाले बेजार..
पत नाही गावात त्याची..
देत नाही उधार..
दिवस-रात्र हातात तो..
'मोबाईल' घेवून बसतो..
एकटया-दुकटयातच तो..
वेडयापरी हसतो..
या 'मोबाईलं'नं तरुण..
खरे 'दिशाहिन' झाले..
समजून - उमजूनही..
'मोबाईल' बाळगू लागले..
#माझी कविता👉🏻
आठवलं कॉलेजमध्ये उतरवलं डायरीत
दिनांक २०/८/२०१९
2 Comments
Good
ReplyDeleteMast aahe
ReplyDelete