रंग बदलणारा सरडा

 आपल्या परसदारात,शेतात किंवा झाडावर दिसणारा हा

रंग बदलणारा सरडा...

मराठी भाषेत याला गिरगीट म्हणून ओळखलं जातं..


आमच्या इथे आमच्या भागात स्थानिक पावरी/पावरा भाषेत याला आलहोयडू या नावाने ओळखलं जातं...बऱ्याच अश्या काही गोष्टी या बद्दल ऐकण्यात आहे..
श्रद्धा/अंधश्रद्धा आहेत..

प्रत्येक जीवाकडे खास कला असते. या कलेच्या माध्यमातून ते त्यांचं जीवन जगत असतात. असंच एक खास गिफ्ट सरड्यांना निसर्गाकडून मिळालं आहे. असं मानलं जातं की, सुरक्षेनुसार सरडे त्यांचा रंग बदलतात. शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी सरडे जिथे बसलेले असतात,तेथून आपोआप ते त्या रंगात स्वत:ला सामावून घेतात. 

सरडे त्यांचा रंग बदलून स्वत:चा बचाव करतात. सरडे आपलं पोट भरण्यासाठी शिकारही करतात. शिकार करताना देखील सरडे त्यांचा रंग बदलतात.ज्याने शिकार पळून जात नाही. त्यामुळे सरडे शिकार सहजपणे करू शकतात...


आज सकाळी अंगणात आलेल्या सरड्याचे हे चित्र...


Post a Comment

0 Comments