खरंच आयुष्य एवढं स्वस्त असतं का?🤔🤔🤔
आज नाही तर उद्या यश मिळेल
आज अंधार तर उद्या प्रकाशही येईल
जीवन असंच संपवायच असतं का ?
खरंच आयुष्य एवढंं स्वस्त असतं का ?
आयुष्य हे नावेसारख आपण त्यातले प्रवासी
मग त्याच नावेतील प्रवाशाने सोबतच्यांना
सोडून जायचं असतं का?
खरंच आयुष्य एवढं स्वस्त असतं का ?
झाला नाही अभ्यास पेपर अवघड गेला
कमी मार्क्स मिळतील समाजात बदनामी होईल
ह्रया भीतीने जीवन संपवायचे असते का?
खरंच आयुष्य एवढं स्वस्त असतं का ?
प्रेमात कधी हार होते कधी विजय सुद्धा
कधी कोण सोडून जातं कधी भेटत ही नाही
जीवन संपवून आपल्या आई-वडीलांना
दुःखाच्या दरीत ढकलून द्यायचं असतं का?
खरंच आयुष्य एवढं स्वस्त असतं का ?
कठीण प्रसंगांना जिद्दीने सामोरे जाव लागतं
कष्टाच्या परीक्षेतून स्वतःला सिद्ध करावं लागतं
तेव्हा कुठे स्वाभिमानाने जगता येतं
इतक्यात कुठे हार मानायची असते का?
काय खरंच आयुष्य एवढं स्वस्त असतं का ?
2 Comments
Very nice poem bro
ReplyDeleteNice
ReplyDelete