अभ्यासाच्या बाबतीत आपण Deep Fake सारख्या तंत्राचा वापर तर करत नाही या याबद्दल स्वतःला विचारायला हवं कधीतरी..
Deep Fake म्हणजे अशी बनावट चित्र, व्हिडीओ जी हुबेहूब खरीच वाटतात..
खरं-खोटं ओळखणं अवघड जातं..
पण मग हे अभ्यासाच्या बाबतीत कसं?
जसं की आपण अभ्यास करतोय असं आपल्याला वाटतंय तर खरं पण खरं पाहता आपण अभ्यास करत नसतो अशी अवस्था.. म्हणायला तर आपण तासंतास अभ्यासिकेत असतो.
परंतू टेबलावरचा मोबाईल हातातल्या पुस्तकापेक्षा जास्त सक्रिय असतो..
कधी कधी तर अभ्यासिका ही अभ्यासिका न राहता कॉलेज होऊन गेलेली असते..
आपण अभ्यासाच्या नावाखाली सेकंड कॉलेज लाईफ जगू लागलोय की काय अशी शंका यावी अशी अवस्था असते..
आता या कॉलेज लाईफ शब्दात काय काय अनुस्यूत आहे हे ज्याचं त्याला व्यवस्थित कळतं. तर एकूण काय की आपण फसवत असतो अभ्यासाच्या नावाखाली..
इतरांना नाही..
स्वतःलाच..
पण कळत नाही..
कळलं तरी वळत नाही..
कुणी सांगणारं नसतं आजुबाजुला..
असलं तर आपल्याला त्याचं ऐकायचं नसतं.. अशी सगळी अवस्था असते..
हे असतं स्पर्धा परीक्षा क्षेत्रातलं Deep Fake.. कित्येक जण त्याला बळी पडतात..
आपण तर त्यात नाहीत ना याबद्दल स्वतःला विचारायला हवं..
दुसरे सांगू शकत नाहीत..
स्वतःलाच करायला हवं हे..
आपलं स्वतःचं आयुष्य आहे, निर्णय स्वतःचे आहेत तर जबाबदारीही स्वतःचं स्वीकारायला हवी..
सुत्र साधं सोपं आहे..
अभ्यास करण्याच्या काळात व्यावसायिक दृष्टीकोण (professionalism) ठेवून जगायला हवं..
म्हणजे आपल्या कामाशी काम..
आणि अभ्यास एके अभ्यास..
स्वतःला सांगून ठेवायचं आपलं काहीतरी स्टेटस तयार होईपर्यंत ना व्हाट्सएपला स्टेटस टाकणार ना स्वतःची स्टोरी सक्सेस स्टोरी बनेपर्यंत फेसबुक-इन्स्टाग्रामला कुठली स्टोरी टाकणार ना स्वतःला 'पोस्ट' मिळेपर्यंत कुणाच्या पोस्टला लाईक आणि शेअर करण्याचा मोह करणार.. मोह खूप सारे असतात..
पण पुढे ते जातात जे मोहाला बळी पडत नाहीत तर त्यावर मात करतात..
Real आयुष्य घडवायला निघालेल्यांना virtual जगात अडकून चालत नाही...
जगातलं Deep Fake इतरांना फसवत असेल पण स्पर्धा परीक्षा क्षेत्रातलं Deep Fake आपल्याला स्वतःलाच फसवतं त्यामुळे सजग रहायला हवं...
साभार-निरंजन
10 Comments
डीप वास्तविकता 👍
ReplyDeleteReality
ReplyDeleteवास्तविकता आहे स्पर्धा परीक्षेची खरंच जर हे करिअर निवडायचे असेल तर विचार करून आणि नियोजन करून उतरले पाहिजे. प्लॅन A आणि प्लॅन B पाहिजे..
ReplyDelete#DeepFake मध्ये ही सुद्धा #Deep वास्तविकता आहे
ReplyDeleteAbsolutely we should think about it..
ReplyDeleteखूप छान सर सद्यःस्थितीत अशा मनस्थिती विद्यार्थी आहेत
ReplyDeleteअप्रतिम आणि वास्तविकता
ReplyDeleteGood very nice
ReplyDeleteVery Good
ReplyDeleteसच मे यार पढाई कम और मोबाईल ज्यादा यही चल रहा है आज कल प्लॅनिंग तो अच्छी कर लेते है लेकिन उस पर खरा उतरना बहुत मुश्किल हो जाता है सुरुवात मे बहुत अच्छा लगता है और पढाई भी हो जाती है लेकिन धीरे धीरे दूर होते जाते है आज नहीं कल कर लुंगा यह सब कुछ
ReplyDelete