काही गोष्टी करायला घेईपर्यंत खूप अवघड वाटतात. आपल्याला जमणारच नाही असं वाटतं.
सोडून द्यावसं वाटतं.
अशावेळी अनुभवी लोकांना बोलून सल्ला घेतला की जरा मदत होते.
मनातला गुंता जरा सैल होऊ लागतो.
गोष्टी आधी मनात जुळून याव्या लागतात, मनात जमायला लागतात मगच त्या प्रत्यक्षात जमतात. भिती, टेन्शन हे बऱ्यापैकी मानसिक असतं ते एकदा बाजूला करता आलं की सुरुवातीला अवघड आणि किचकट वाटणाऱ्या गोष्टीही आपल्याला जमू लागतात.
आपण एकदा सुरुवात केली अवघड गोष्टी आधी जेवढ्या अवघड वाटत होत्या तेवढ्या त्या अवघड नाहीत हे कळू लागतं.
जमू लागतं आपल्याला,
हळूहळू हे सवयीचं होतं.
हीच खरी प्रक्रिया असते यशाची.
मनात जिंकता आलं की प्रत्यक्षातही जिंकता येतं.
#BeMotivated
#03/03/2024
#AnilJPawara
2 Comments
Yes very nice
ReplyDeleteVery Nice
ReplyDelete