उमराणी बु!! च्या युवा टीम व ग्रामस्थांनी मिळून श्रमदानातून साकारला वनराई बंधारा
उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी माणसे व जनावरांची त्रेधातिरपीट व पाण्यासाठी करावी लागणारी वणवण यामुळे जलसंवर्धनासाठी प्रतिवर्षी प्रयत्न करणाऱ्या उमराणी बु!येथील युवा वर्ग व ग्रामस्थांनी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने उमराणी बु! खु! च्या सीमेवरील नाल्यावर/ओहोळावर वनराई बंधारा बांधला आहे. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
उमराणी बु!! येथे पाणी आडवा, पाणी जिरवा या उपक्रमाची सुरवात उमराणी च्या युवकांनी व ग्रामस्थांनी मिळून साकारली,पाण्याची टंचाई पासून व गुरांसाठी पाणी साठवून लोकांना अधिक फायदा व्हावे म्हणून व शेती साठी त्या वनराई बंधारा चा वापर व्हावा म्हणून सर्व युवा वर्ग व ग्रामस्थांनी मिळून वनराई बंधारा साकारला आहे.
ऐन उन्हाळ्यात उमराणी बु! खु! पंचक्रोशीत पाण्याची समस्या अतिशय गंभीर असे स्वरूप प्राप्त करते. प्राणी व गुरांसाठी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. जानेवारी महिन्यानंतर सर्व ओहोळ कोरडे पडतात. यावर उपाय म्हणून उमराणी बु! मधील युवा व ग्रामस्थांच्या मदतीने यावर्षी तीन ते चार वनराई बंधारे बांधणार आहे. या वर्षीही उमराणी खुर्द व बुद्रुक येथील ओहोळावर सिमेंट पिशव्यांचा माती भरावाचा बंधारा बांधला आहे. ऑक्टोबर महिन्यात बांधलेल्या या बंधाऱ्याचा उपयोग मार्च, एप्रिल महिन्यांपर्यंत ग्रामस्थांना होऊन गाई,गुरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
युवा वर्गानी अतिशय मेहनत करून श्रमदानातून माती खोदली, पिशव्या भरल्या व ग्रामस्थांच्या मदतीने बंधाऱ्याचे काम पूर्ण केले.
‘पाणी आडवा, पाणी जिरवा’चा संदेश ग्रामस्थांना दिला. या वेळी या उपक्रमासाठी मोठ्या संख्येने युवा व ग्रामस्थ उपस्थित होते विशेष उपस्थिती कृषीसेवक- वामन पावरा सर होते. आणि या उपक्रमात उमराणी बु!! ची युवा टीम पुढली प्रमाणे:-प्रा. बटेसिंग पावरा इंजि विशाल पावरा ,चेतन पावरा,
संतोष पावरा ,विबीशन पावरा,ब्रिजलाल पावरा,राजेंद्र पावरा,दिलीप पावरा,राजू साळवे,किसन पावरा,हर्षल पावरा संजय पावरा,सुरेश पावरा,सायसिंग पावरा,पिंटू पावरा,अनिल पावरा,जयवंत पावरा,सुनील पावरा, इंजी.राजेंद्र पावरा,(मुवाड़ी पाडा),अतुल पावरा,जयवंत ,सुकलाल पावरा,सायका पावरा,नितिन पावरा,पिंटा पावरा, ज्ञानेश्वर पावरा ,उदयसिंग पावरा,रतिलाल पावरा. इ युवा व ग्रामस्थ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्रमदान केले.तरी ह्या पुढेही गाव विकासासाठी उमराणी बु चे युवा हे नेहमी कार्य तत्पर राहु असे आश्वासन युवावर्गा कडून देण्यात आले.
प्रतिवर्षी युवावर्ग व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान केले जाते.यानिमित्ताने जलसंवर्धनाबाबत जागृती व श्रमसंस्कार होतो.
हा उपक्रम कौतुकास्पद असून,पंचक्रोशीतील गुरांना व प्राण्यांना याचा उपयोग होतो. जलसंवर्धनासही या निमित्ताने हातभार लागतो.
0 Comments