माणूस जगतो तो फक्त स्वत:च्या स्वार्थासाठीच . . . . 👉पुढे वाचा का?


माणूस जगतो तो फक्त स्वत:च्या  स्वार्थासाठीच . .



आपण प्रत्येक वेळेस बोलत असतो तो / ती / ते / माझे / माझी ......... आहेत . हे सर्व आपण बोलतो ते फक्त समाजातील काही रूढ झालेल्या सवयींमुळे. . . आपण अनेकदा म्हणतो कि माझे ......... व्यक्तीवर खूप प्रेम आहे पण हे तितकेसे माझ्या मते खरे नाही.


लहानपणी आपल्याला एक गोष्ट सांगितली जायची, एक मांजर आणि तिचे पिल्लू एका डबक्यात अडकतात त्या डबक्यात पाणी यायला लागते हळू हळू पाण्याची पातळी वाढायला सुरुवात होते , मांजर स्वत आणि त्या पिल्लाला वाचवण्यासाठी उंच उंच उड्या घेवून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात पाण्याची पातळी वाढतच असते शेवटी मांजर त्या पिल्लाच्या पाठीवर पाय ठेवून बाहेर पडते आणि ते पिलू त्या डबक्यातच मरते सारांश काय ? तर प्राणी सुद्धा फक्त स्वार्थाचाच विचार करतात . .


त्याचप्रमाणे आपण अनेक बंधनांत अडकलेलो आहोत पण हे एक भावनिक पाश आहे वास्तविक पाहता कोणी कितीही जीव तोडून बोलले कि मी तुझ्यासाठी ........ करायला तयार आहे पण वेळ येताच त्याची फाटायला लागते . . . कारण त्याने व्यक्त केलेले प्रेम हे एक तर शारीरिक आकर्षण असू शकते किंवा नाटक किंवा ढोंग . . .


कारण तो / ती व्यक्ती फक्त आणि फक्त स्वत:च्या स्वार्थाचाच विचार करत असते. ..


कुणाकडून तरी आपल्याला काहीतरी मिळेल या हेतूने माणूस नाते संबंध वाढवण्यास सुरुवात करतो. मग तो हेतू त्याचा त्याच्या व्यवसायाशी संबंधित असेल किंवा मानसिक कारण असेल किंवा सामाजिक कारण असेल तर तो जगतो आणि जगतो फक्त स्वतसाठीच. . .


प्रत्येकाचे फक्त आणि फक्त स्वतावरच प्रेम असते. . .


म्हणून या जगात स्वार्थ खूप महत्तम समजला जातो. . .


या लेखाचा तसा काही विशेष उद्देश नाही फक्त मनातील शब्दांना या द्वारे वाट मोकळी करून दिली कारण यामागे पण माझा स्वार्थ आहे माझा लेख खूप जणांनी वाचला पाहिजे. . . बरोबर कि नाही. मित्रांनो,
               #अनिल जे.पावरा.

Post a Comment

0 Comments