अस्तंभा शिखर // सातपुडापर्वत रांगेतील सर्वोच्च उंच शिखर // अस्तंबा ऋषी यात्रा

अस्तंभा शिखर 

अस्तंभा हे सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर असुन ते सातपुड्याच्या 4 थ्या रांगेत आहे. 

सातपुडा पर्वत रांगेत नंदुरबार जिल्ह्यात तळोदा/धडगाव तालुक्यातील उंच शिखर अस्तंबा ऋषी हे ऐतिहासिक ठिकाण आहे येथे गुफा आहेत. दुर्मिळ लेण्याही आहेत या ठिकाणी दरवर्षी धनयत्रोदशीला (दिवाळीला)यात्रा भरते..
हजारोच्या संख्येने भाविक-भक्त या उंच शिखरावर दर्शनाला येतात...

याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 1,325 मीटर म्हणजे = 4,347.11 फूट उंच आहे.
(काही पुस्तकांत मात्र 4,500 फूट म्हणजे = 1,371.6 मीटर असे आहे).
याचे गणित आपण निट समजुन घेऊ.. 4,500 फूट म्हणजे = 1,371.6 मीटर आहे. 1,325 मीटर = 1.325 कि.मी. असे आहे. 
अस्तंभा हे गांव  एतिहासिक व धार्मिक स्थळ आहे. येथे शिखरावर चढण्यासाठी खूप अरुंद व जीवघेणी अशी पायवाट असतांनाही नंदुरबार जिल्हा व गुजरात परिसरातील  आदिवासी भाविक मोठ्या ऊत्साहाने चढून दर्शन घेतात हे विशेष. माथ्यावर पोहोचल्यावर येथील जगावेगळी अल्हाददायक थंड हवेच्या प्रसन्नतेने मनुष्य सुखावतो. येथील एक विशेष म्हणजे शिखरावर कितीही लोक गेले तरी सर्व भाविकांना दर्शनासाठी व बसण्यासाठी जागा उपलब्ध होतेच. 
धनत्रयोदशीच्या दिवशी शिखराच्या पायथ्याशी भव्य यात्रा भरते. आणि याच दिवशी लाखो भाविक चढायला सुरुवात करतात. दिपावली च्या दिवशी मुख्य यात्रा असते. रात्री सोंगाड्या पार्टीचे आयोजन केले जाते. तसेच भाविक आपले नवस पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या वेष भूषेत येतात. नाच गाण्याची सोंगाड्या पार्टीची मुहूर्तमेढ येथूनच होते. दर्शनाला आलेले भाविक नशिबाचा भाग म्हणून रोश्या गवत घेऊन जातात. 



सात चिरंजीवातील एक अश्वस्थामा हे आहे. श्रापीत अवस्थेत कपाळा वरिल भळभळणारी जखमेच्या थंडाव्यासाठी ते वणवण हिंडत होता. अखेर त्यांना आदिवासी देवता राजा पांठा व गांडा ठाकूर ने या शिखरावर आश्रय घेण्याची समंती दिली. ते चिरंजीव असल्यामुळे तेथे स्त्रीया यात्रेला जात नाही. ते याच शिखरावर वास्तव्याला आहे. असे आपल्या समाजातील व भागांतील जाणकार सांगतात.        










अस्तंभा शिखरातील प्रमुख ठिकाणे:
1)स्थानक
2)ऊंगोलकुंड(भिम कुंड)
3)डाकीन दगड
4)हाकडो थेवो 
5)मुख्य शिखर(देव स्थानक) 
6) झुला 
7)गांड गिसरी 
8)मामा - भांजा
वरिल प्रमुख मुख्य ठिकाणे आहे. अजुन तेथे बघण्यासाठी  विविध ठिकाणे आहेत. तेथे डोंगरावर गेल्यावर आसपासच्या जिल्ह्याचा नजारा खुपसुंदर दिसते. ट्रेकिंग करणार्यांनसाठी ते एक आकर्षक असे ठिकाण आहे..

                                           इतिहास पार्श्वभूमी       

अश्वत्थामा (Ashwatthama) हा महाभारतातील एक अत्यंत प्रसिद्ध योद्धा आणि गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र होता. अश्वत्थामा (अर्थ: घोड्याच्या आवाजासारखा आवाज असलेला”)
अश्वत्थामा हा कौरव सेनेचा प्रमुख योद्धा होता.त्याने कुरुक्षेत्र युद्धात पांडवांविरुद्ध लढा दिला.त्याच्या हातात दिव्य रत्न (मणि) होते, ज्यामुळे तो अजेय आणि अमर मानला जात होता.युद्धात, द्रोणाचार्यांचा वध झाल्यानंतर अश्वत्थामा अत्यंत क्रोधित झाला आणि पांडवांच्या छावणीवर रात्री हल्ला केला.त्या हल्ल्यात त्याने द्रौपदीच्या पाच पुत्रांचा (उपपांडवांचा) वध केला, ज्यामुळे त्याला शाप मिळाला.
भगवान श्रीकृष्णाने त्याला शाप दिला की—"तू ३,००० वर्षे जखमी अवस्थेत पृथ्वीवर फिरशील; मृत्यू तुला मिळणार नाही."त्यामुळे अश्वत्थामा अमर पण शापित जीव मानला जातो.

लोककथा आणि श्रद्धास्थळे :-  काही लोककथांनुसार, अश्वत्थामा आजही जिवंत आहे, आणि भारतातील काही पवित्र स्थळांवर (उदा. गिरीनार पर्वत, बुरहानपूर, नर्मदा किनारा) त्याचे अस्तित्व असल्याच्या कथा सांगितल्या जातात. भारतातील अनेक भागांत अश्वत्थामा आजही जिवंत आहे आणि तप करीत आहे, अशी लोकश्रद्धा आहे.विशेषतः बुरहानपूर (म.प्र.), गिरीनार पर्वत (गुजरात) आणि नर्मदा किनारा येथे त्याचे अस्तित्व असल्याच्या कथा प्रचलित आहेत.काहींनी सांगितले आहे की तो रक्ताळलेला साधू म्हणून दिसतो आणि अचानक गायब होतो.

1. बुरहानपूर (मध्य प्रदेश)

येथे स्थानिक लोक सांगतात की अश्वत्थामा आजही तप करायला नर्मदा नदीच्या काठावर येतो.काहींनी सांगितले आहे की तो डोक्यावरून रक्त वाहत असतो, आणि नर्मदाजलाने जखम धुतो."अश्वत्थामा घाट" नावाचे ठिकाणही बुरहानपूरमध्ये आहे.

2. गिरीनार पर्वत (गुजरात)

जुनागढजवळील या पर्वतावरही अश्वत्थामा तप करत असल्याची आख्यायिका आहे.साधूंनी सांगितले आहे की काहीवेळा एक विचित्र तेजस्वी पुरुष येथे दिसतो.

3. नर्मदा किनारा (मध्य भारत)

नर्मदा परिक्रमा करणारे साधू सांगतात की काही वेळा अश्वत्थामाचे दर्शन होते.तो शांत, रक्ताळलेला आणि लांब केस असलेला साधू म्हणून दिसतो, आणि अचानक गायब होतो.

4. विदर्भ आणि सातपुडा प्रदेशातील कथांमध्ये

काही लोक मानतात की अश्वत्थामा सातपुडा पर्वतरांगेत किंवा अस्तंभा शिखर परिसरात अद्याप भटकतो.तो ध्यानधारणेत मग्न असतो आणि मानवांशी संवाद करत नाही. या कारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक ही येत असतात 


                                                                          माहिती संकलन व लेखन - प्रा.अनिल जे पावरा 

Post a Comment

10 Comments