चिमुकल्यांना गरज आपल्या ऊबेच्या मदतीची...

चिमुकल्यांना गरज आपल्या ऊबेच्या मदतीची...👏🏻👏🏻






नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील अनेक शाळा ह्या अतिदुर्गम भागात आहे. त्यातच काही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे शिक्षण हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या देण्याचे कार्य करत असतात...
त्यातीलच जि.प.शाळा काल्लेखेतपाडा ह्या शाळेत एकूण 140 च्यावर मुलं शिक्षण घेत आहे..आदिवासी भाग हा अतिदुर्गम असल्याने अठराविश्व दरिद्री या भागात आढळून येत.अनेक प्रकारची आर्थिक समस्या येत असल्याने पालक वर्ग मुलांना तेथून जवळ असलेल्या शाळेत आपल्या पाल्याना पाठवत असतात..आणि 10 ते 12 किलोमीटर अंतर कापत रोज सकाळी 10 वाजता तर शनिवारी 7 वाजता हे मुले शाळेत येत असतात.. येथील शिक्षक वर्ग सुद्धा खूप प्रामाणिक पणे ज्ञानार्जनाचे काम करत असल्याने या शाळेतील विध्यार्थ्यांमध्ये सुद्धा खूप उत्साह आणि प्रेरणा आहे.. त्याचप्रमाणे दर दिवशी शाळेतील नवनवीन उपक्रमामुळे पहिली पासून सातवी पर्यंतच्या विध्यार्थ्यांमध्ये एक शाळेबद्दल,शिक्षणाबद्दल आवड निर्माण झालेली आहे...
आणि विशेष म्हणजे दर शनिवार आणि रविवार या दिवशी या शाळेतील प्रत्येक विध्यार्थ्यांच्या घरी खेडोपाडी,डोंगरदऱ्यात राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या घरी दौरा असल्याने त्यांना त्या-त्या पाड्यातील,गावातील विध्यार्थ्यांना शिक्षकांप्रति असलेला आदर आणि एक जवळीक निर्माण झालेली आहे. तसेच प्रत्येक पाड्यातील विद्यार्थी तसेच पालक यांच्या परिस्थितीची  जाणीव त्यांना ज्ञात असल्याने, ते वेळोवेळी वस्ती, पाड्यावर जाऊन पालक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करत असतात...
हा उपक्रम गेल्या वर्षभरापासून हे शिक्षक राबवत आलेले आहे,आणि पुढे देखील हा उपक्रम सुरू राहणार आहे.कारण विध्यार्थ्यांमध्ये होत असलेला बदल आणि पालकांचा सहभाग आणि त्याची मोलाची साथ ह्या शाळेला मिळत आहे..
पण गेल्या आठवड्यापासून सातपुड्याच्या आदिवासी भागात थंडी हळूहळू वाढत जात आहे.आणि वाढणाऱ्या थंडीत विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक श्री. रुपेशकुमार डी.नागलगावे यांनी तेथील आदिवासी कुटूंबातील दारिद्र्य लक्षात घेता..त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनकरीता एक आवाहन त्यांनी केलेले आहे...

"सर्वांना नमस्कार.आज मी ज्या ठिकाणी नोकरी करत आहे,तो समाज अदिवासी आहे.आज ही १८ विश्व दारिद्रय.मी मुलांच्या अभ्यासासाठी रात्री ७ ते ९ पाड्यावर फिरत असतो. असल्या थंडित पण मुले विना स्वेटरचे अभ्यास करत बसलेले असतात. त्यांना स्वेटर घेऊन देण्यासाठी प्रयत्नशिल आहे.शाळेची पटसंख्या १४० आहे.सर्वासाठी ₹३०००० ते ४००००रू अंदाजे आहे. तरी आपल्या समाजात कोणी दानशुर व्यक्ती असतील तर त्यांना ही माहीती पाठवा.   मुख्याध्यापक संपर्क - रूपेशकुमार दिगंबर नागलगावे. मो.नंबर ९४२३८९३७०९ "

अनके समाजबांधवांनी सुद्धा आपल्या कडून फुल ना फुलाची पाकळीच्या रूपात म्हणून आपले योगदान दयावे.आणि विध्यार्थ्यांना आपल्या मदतीची ऊब द्यावी ही नम्र विनंती...
मा.मुख्याध्यापक सर रुपेश नागलगावे, श्री लक्ष्मीपुत्र उप्पीन सहशिक्षक हे  आदिवासी भागातील उमराणी बु! काल्लेखेतपाडा या गावात कार्यरत आहे.ते प्रत्येक वेळी विद्यार्थांच्या शिक्षणासाठी धडपड करीत असतात.ते प्रत्येक विद्यार्थांच्या घरी जाऊन त्याच्या बद्दल माहिती घेत असतात.या कडाक्याची थंडीत विद्यार्थाची भेट  घेतली असता अनेक विद्यार्थी थंडीत अभ्यास करत असलेले आढळून आले. आणि त्यांनी विद्यार्थासाठी स्वेटर घेण्यासाठी सामाजिक संस्था समाजबांधवाकडुन आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
ज्यांना आपली आर्थिक मदत विध्यार्थ्यांना द्यायची असेल, त्यांनी सरांशी संपर्क आपल्या मनाप्रमाने रक्कम वजा देऊन वरील नंबर वर फोन करून कळवू शकता,किंवा त्यांना भेटून देऊही शकता..

🙏कृपया हा मेसेज पुढे पाठवा....


छायाचित्रे


























Post a Comment

0 Comments