कॅबिनेट मंत्री अँड.के सी पाडवी यांचा जीवन परिचय...
नंदुरबार जिल्ह्याचे अक्राणी अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार मा.श्री अँड.के सी पाडवी यांचा जीवन परिचय....
त्यांचा जन्म अक्राणी(आत्ताचे नवीन नाव धडगांव)तालुक्यातील असली, तालुका अक्राणी, जिल्हा नंदुरबार गावात जन्म 3 मार्च 1957 मध्ये झाला.
त्यांचे शिक्षण बी. ए.,एलएल. एम. झालेले आहे..
त्यांना ज्ञात असलेल्या भाषा आहे.मराठी, हिंदी, इंग्रजी व आदिवासी भाषा त्यांना ज्ञात आहे..
त्यांची वैवाहिक माहिती पुढीलप्रमाणे आहे...ते
विवाहित आहे आणि त्यांची पत्नी श्रीमती हेमलता
त्यांना दोन अपत्ये आहे(एक मुलगा एक मुलगी)
त्यांचा व्यवसाय शेती व वकिली आहे..
त्यांचा राजकीय पक्ष आहे.. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मतदारसंघ आहे.1-अक्कलकुवा (अनुसूचित जमाती), जिल्हा नंदुरबार.
आणि त्यांच्या बद्दल थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे ते अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी संघटना,संस्थापक,अध्यक्ष, आहेत.. सातपुडा मानव मुक्ती केंद्र,असली अस्तंबा अध्यक्ष,
देवमोगरामाता शिक्षण संस्था, असली या संस्थेमार्फत आदिवासी भागात दोन आश्रम शाळा, तीन हायस्कूल्स सुरू केले; आदिवासी समाज जागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन संघटनात्मक कार्यावर भर होळी दिवाळी महोत्सवांचे आयोजन चेअरमन, दि हिलव्हॉली फूड अँड फुट प्रोसेसिंग को-ऑप. सोसायटी लि. असली ता. अक्राणी जिल्हा नंदुरबार.
त्यांचे राजकीय कारकीर्द सुरुवात 1990पासून झाली... 1990 पर्यंत ते जनता दलाचे कार्य केले..
नंतर1991 पासून काँग्रेस पक्षाचे कार्य केले आतापर्यंत या मतदारसंघात एकूण 7 वेळा आमदार म्हणून ते निवडून आले आहे...1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा आमदार झाले आहे.
ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभेवर पुन्हा आमदार म्हणून फेरनिवड झाली आणि यावेळी त्यांना महाविकासाघाडी मध्ये कॅबिनेट मंत्री पद मिळालेलं आहे..
2 Comments
Good आपडा देशम आपडु राज जय आदिवासी
ReplyDelete👌👌👌
ReplyDelete