मूठभर स्वप्नं
तो घेऊन आला पूर्वेला
ओंजळीत मूठभर स्वप्नं
अन् उधळून दिलीत....
दाही दिशांना ती किरणं
कुणी म्हणे प्रभात झाली
म्हणे कुणी नवा दिवस..
पण एक चैतन्य भारलेले
क्षण नव्याने जगण्याचे..
कालचा तिमिर सारुन
प्रकाशाकडे बघण्याचे
कुणी व्यवसाय , नोकरी..
कुणी जगतोयं नवी रीत
कुणी जपतोयं नातीगोती
कुणी तरल वेडी प्रीत....
प्रत्येकाचीच ओंजळ मग
कणाकणांनी भरली जाते
पण अचानक त्याची
जाण्याची वेळ होते.....
तोही हिरमुसतो आणि
पाऊले अडखळतात त्याची
झाडांच्या फांद्यांआड......
पण जावेच लागते त्याला
परत मूठभर स्वप्नं घेऊन
उद्या क्षितीजावर यायला.....
Ⓒअनिल जे पावरा...
0 Comments