नवीन वर्ष | संकल्प 2025

नवं वर्ष जवळ आलं की मनात नवनवीन विचारांचा गोंधळ उडतो, 
कधी उत्साह तर कधी भीती जाणवते... 
पण या सगळ्यातूनही स्वप्नं आणि संकल्प कायम राहतात...
तीच तर आपल्याला पुढे नेण्यासाठी बळ देतात...
आयुष्य सुंदर बनवण्यासाठी आपण स्वप्नं पाहतो...
स्वप्नं हीच माणसाच्या जीवनाची खरी ओळख बनतात...
ती आपल्याला जगण्याचा ध्यास देतात,, 
वाटचाल करण्यासाठी नवी उमेद देतात...
काही स्वप्नं अपूर्ण राहिली तरी त्यांचा आपल्यावरचा प्रभाव मात्र कायम राहतो...
ती अपूर्णता कधी आपल्याला खिन्न करते, तर कधी तीच अपूर्णता पुढे जाण्याची प्रेरणा बनते...
आयुष्य म्हणजेच स्वप्नांचा प्रवास आहे; 
कधी पूर्ण होणाऱ्या, 
कधी अधुऱ्या राहणाऱ्या, 
पण तरीही जीवनाला अर्थ देणाऱ्या..!






Post a Comment

0 Comments