⭕आदिवासी विकास विभाग⭕
आदिवासी विकास विभाग, राज्यातील अनेक विभागातील संवेदनशील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पआदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी १९७२ मध्ये आदिवासी विकास निदेशालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९७६ साली आणि १९८४ मध्ये स्वतंत्र आदिवासी विकास मंत्रालय सुरु करण्यात आले. १९९२ मध्ये आदिवासी विकास निदेशालय हे आदिवासी विकास आयुक्तालय विलीन करण्यात आले.
⭕आदिवासी विकास विभागाची रचना
१९८४ मध्ये स्वतंत्र आदिवासी विकास विभाग या नावाने मंत्रालय सुरु करण्यात आले. या अंतर्गत कॅबिनेट मंत्री, आदिवासी विकास विभाग, हे प्रमुख असतात. त्यांना राज्यमंत्री साहाय्य करीत असतात.
रचना : आदिवासी विकास विभागाचे प्रशासन अधिक उत्तरदायी होण्याच्या दृष्टीने १९९२ मध्ये या विभागाची पुर्नरचना करण्यात आली. विभागातील प्रशासन यंत्रणेची रचना पुढीलप्रमाणे आहे.
⭕आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक
आदिवासी विकास विभागाअंतर्गत आयुक्तालय, आदिवासी विकास विभाग नाशिक महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या योजनांची, उपयोजनांची अंमलबजावणी व पर्यवेक्षणाचे काम करते. आदिवासी उपयोजनेच्या अंमलबजावणीची मोठी जबाबदारी या विभागाकडे आहे. आदिवासी आयुक्तालयाअंतर्गत चार प्रादेशिक अप्पर आयुक्त आहेत. ठाणे, नाशिक, नागपूर व अमरावती या प्रादेशिक विभागांतर्गत २० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येतात. या २० ए.आ.वि. प्रकल्पांमध्ये ११ संवेदनशील ए.आ.वि. प्रकल्प आहे. या प्रकल्पांची नावे पुढील तक्त्यात दिली आहे.
⭕राज्यातील संवेदनशील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
⭕आदिवासी विकास प्रकल्प गट,
जिल्हे आणि त्यांचे तालुका कार्यक्षेत्र
१)जव्हार ठाणे जव्हार, मोखाडा, वाडा
२)डहाणू ठाणे डहाणू, तलासरी,पालघर(भा), वसई (भा)
३)नाशिक नाशिकपेठ, दिंडोरी (भा),नाशिक(भा), इगतपूरी(भा)
४)कळवण,नाशिक,सुरगाणा,कळवण,बागलाण(भा)
५)तळोदा,नंदुरबार,अक्राणी व अक्कलकुवा(भा), तळोदा शहादा (भा)
६)किनवड,नांदेड,किनवड (भा)
७)धारणी,अमरावती,धारणी, चिखलदरा
८)गडचिरोली,गडचिरोलीधानोरा व कुरखेडा, कोरची, आरमोरी (भा), वडसा देसाईगंज(भा), गडचिरोली
९)अहेरी,गडचिरोली,अहेरी, सिरोंचा, मूलचेरा, चार्मोशी
१०)भामरागड, गडचिरोली,एटापल्ली व भामरागड
११)पांढरकवडा यवतमाळ केळापूर(भा), राळेगांव(भा), घाटंजी(भा), झरीझामणी
⭕वरीलप्रमाणे आदिवासी विकास विभागाची विस्तृत अशी प्रशासकीय रचना आहे. तर केंद्र शासन व राज्य शासनाची आदिवासी कल्याणाची धोरणे व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रात विशिष्ट यंत्रणा अस्तित्वात आहे.
1 Comments
छान माहिती आहे अवश्य वाचा
ReplyDelete