महाराष्ट्राला मिळाला नवा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे

अखेर महाराष्ट्राला नवे सरकार मिळाले.......


गेल्या महिन्यापासून कोणाचं सरकार महाराष्ट्रात येणार हा एक चर्चेचा विषय ठरला होता...ज्या मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं अट्टहास केला ते मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरेंना मिळालंय. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंसाठी ही मोठी राजकीय संधी असणार आहे. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री ठरलाय. अब की बार उद्धव सरकार.आणि महाविकासआघाडी हे निश्चित झाले आहे. आज शिवाजी पार्कवर त्यांचा शपथविधी पार पडला आहे. शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडला आहे.या शपथविधीसाठी देशभरात निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत.
महाराष्ट्रात 12 नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. मात्र 23 नोव्हेंबरला रातोरात राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि राज्यातील सत्तासमीकरणे बदलली.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. पण हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि कोर्टाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र त्यापूर्वीच अजित पवारांनी राजीनामा दिल्याने फडणवीस सरकार अवघ्या चार दिवसात कोसळलं.

आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असल्याने,लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे...की हे नवे महाविकासआघाडीचे सरकार शेतकरी, सर्वसामान्य जनता,नोकरदार वर्ग यांच्याकरिता काय नवे निर्णय घेणार हे बघणे आता गरजेचं आहे....

ग्रँड शपथविधी- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडला आहे. यांच्याबरोबच
शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यासारख्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हजारो जण उपस्थित होते..
आता पुढील पाच वर्षे हे सरकार जनतेत आपला विश्वास पक्का करेल...का जनतेच्या आशा फोल ठरवेल हे बघणे आता महत्वाचे आहे.....

Post a Comment

1 Comments