अजून किती बळी जाणार???

अजून किती बळी जाणार??? 

भारतीय संस्कृती ही जगात सर्वात चांगली आहे.भारतात शिक्षण आणि संस्कार चांगले केले जातात. असं म्हटलं जात.. पण हे कितपत म्हणणं योग्य आहे...
तरी पण देशात
दिल्लीमधे निर्भया,महाराष्ट्रातील कोपर्डी आणि आज हैदराबादमधील प्रियांकरेड्डी ह्या घटना देशाला काळिमा    लावणाऱ्या आहेत.

रात्री 9.15 ची वेळ. तिची स्कुटी पंक्चर झाली. तिने हि घटना घरी कळवली. यावेळी तिने मदत मिळाली असून एक व्यक्तीने लिफ्ट दिली असल्याचे सांगितले. तोच तिचा शेवटचा फोन ठरला…मदतीसाठी आलेला तो व्यक्ती त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नेमकं काय केलं. हे दुसऱ्या दिवशी सर्वांनीच पाहिलं. कारण हैदराबादमध्ये पुन्हा एक ‘निर्भया’ प्रकरण घडलं होत. 27 वर्षाच्या एका वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला आहे. अजून किती बळी जाणार…? हाच प्रश्न आता सर्वांना पडला आहे…

 या निर्भया सारख्या अनेक मुली घरापासून दूर मेट्रो सिटीमध्ये राहतात. काही फॅमिलीसोबत पण तरीही कुठेतरी त्या एकटीने फिरत असतील. पण या अशा घटनांमुळे पालकांची चिंता मात्र वाढते. मग इतर मुलींनाही बाहेर जाताना सांगितले जाते. सांभाळून रहा, कपडे चांगले वापर. जास्त फॅशन करू नको.

एका चित्रपट होता गँग रेप केसवर आधारित एका चित्रपटात पोलिसच आरोपींना शिक्षा देतो ती लिंग परिवर्तनाची. बलात्कार करणाऱ्या आरोपींना पोलीस गायब करतो आणि त्यांचे तरुणीत रूपांतर करून आणतो. चित्रपट पाहताना वाटलं की अरे अस काहीतरी व्हायला पाहिजे या आरोपीसोबत. जेव्हा सर्वच आरोपी स्वतः एका स्त्रीला येणारा अनुभव घेतील तेव्हाच खर तर त्यांना महिलांच्या समस्या समजतील. पण त्याला परत जाणीव असायला हवी.


गोष्ट उघडकीस आली तेव्हा सोशल मीडियाला जाग आली. पण समाजाचे डोळे कधी उघडणार काय माहिती. अस म्हणण्याच कारण म्हणजे, या आधी झालेलं निर्भया, कोपर्डी आणि आता हैदराबाद.. घटना ताजी आहे तोवर कॅडल मार्च निघतील. निदर्शने ,घोषणाबाजी होईल. व्हॉटस अप फेसबुकवर फोटो अपलोड होतील. तिला न्याय मिळावा म्हणून समिती स्थापन केली जाईल. आरोपींना जन्मठेप किंवा फाशी सुनावली जाईल. आणि या प्रकरणावर तिला न्याय मिळाला’ अशा मथळ्याच्या बातम्या येतील.
पण, पुन्हा 1 ते 2 वर्षात आणखी एखादी निर्भया, कोपर्डी, हैदराबाद या समाजातील क्रूर भावनेच्या बळी ठरतील. पण हे प्रकार सुरू राहतील एवढं मात्र खरं..

न्याय हा भेटला पाहिजे. आणि त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे. नाहीतर जिवंत जाळून टाका,म्हणजे कळेल त्यांना..

जय आदिवासी जय बिरसा

Post a Comment

5 Comments