शारदाई फाऊंडेशन उमराणी बु! तर्फे आंबेडकर जयंती कार्यक्रम




शारदाई फाऊंडेशन उमराणी बु तसेच उमराणी बु! खु! क्रांतीवीर खाज्या नाईक स्मृतिदिन तसेच भारतरत्न विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम उस्तव समिती उमराणी बु! यांच्या संयुक्त विध्यमानाने जयंती उस्तव कार्यक्रम पार पडला......

कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवत गावातून रॅली काढण्यात आली......



शारदाई फाऊंडेशन उमराणी बु!खु! तसेच ग्रामस्थ याच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उमराणी बु! ता धडगांव येथे संपन्न झाले.....

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीवीर खाज्या नाईक तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,आणि आदिवासी कुलदैवत याहा मोगी माता यांच्या प्रतिमेचे पूजन व उदघाटन उपस्थित पाहुण्याच्या हस्ते करून कार्यक्रम स्थळी कार्यक्रमाची सुरवात झाली.....कार्यक्रमात उपस्थित मान्यवर याचा सत्कार शाल,नारळ देऊन झाला....आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली...शारदाई फाऊंडेशनचे संस्थापक जगदीश एल.पावरा यांनी आपले प्रास्ताविक व्यक्त करताना म्हटले कि,वर्षभरात आपल्या गावात अनेक कार्यक्रम घेत असतो, आणि त्यात आपला आजचा कार्यक्रम हा विशेष असतो, त्यासाठी गावातील जनतेला त्यांनी मोठया लोकसंख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन केले,आणि शुभेच्छा दिल्या.....

या समाजप्रबोधन कार्यक्रम सोहळ्यास अध्यक्ष म्हणून शहरातील जेष्ठ व्यक्ती ओंकार दादा परमार हे उपस्थित होते.अध्यक्षीय भाषण करतांना आणि विचार व्यक्त करतांना त्यांनी आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान,आणि आंबेडकरांचे शैक्षणिक बाबतीत योगदानाबद्दल माहिती दिली..तसेच त्यांनी तमाम आदिवासी समाजबांधव यांना आवाहन करतांना आपल्या मुलांना प्रत्येकांनी शिक्षण देणे खूप आवश्यक आहे,आपल्या पाल्यांना शिकवले पाहिजे...तसेच तरुणाना मार्गदर्शन करतांना त्यांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आणि समाजप्रबोधन कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे.आणि आंबेडकरांचे विचार आत्मसात करून समाजकार्य आणि शैक्षणिक कामात योगदान द्यावे असे आवाहन केले...आणि प्रमुख पाहुणे म्हणून जि. प.शाळेतील जेष्ठ शिक्षिका श्रीमती शकुंतलाताई ढोलार उपस्थित होते..त्यांनीही आपल्या मार्गदर्शनात म्हटले की आपल्या आदिवासी भागातल्या मोलमंजुरी करण्यासाठी स्थलांतरित होत असलेल्या कुटुंबाचे विस्थापन रोखले पाहिजे... आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणात बाधा होऊ नये म्हणून त्यांचे विस्थापन रोखले पाहिजे...तसेच गावातील सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण केले पाहिजे..तसेच समाज परिवर्तनासाठी एकत्र आले पाहिजे यासाठी ग्रामस्थ,तरुणांना आवाहन केले........

तसेच उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा सचिव आणि लोकमतचे धडगांवचे वार्ताहर राजू पावरा यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना क्रांतिवीर खाज्या नाईक यांचे आदिवासी समाजातील योगदानाबद्दल माहिती दिली.तसेच तरुणांना आवाहन करतांना म्हटले आजच्या युवक पिढीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची खूप गरज आहे..त्यामुळे समाजप्रबोधन कार्यात आंबेडकरांच्या विचार घेऊन चालेले पाहिजे...असे आवाहन केले.....आणि आपल्या गावातील शैक्षणिक व्यवस्था सुधारण्यासाठी युवकांनी आपल्या गावात सुद्धा वेळ द्यावे असे आवाहन केले.......

 

उपस्थित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अनिल जे पावरा यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले,की गावातील ग्रामस्थांना आवाहन करतांना म्हटले की,समाजपरिवर्तन,समाजप्रबोधन कार्यक्रमामध्ये युवकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.... आंबेडकरांचे विचार आत्मसात करून वाटचाल करावी....असे त्यांनी आवाहन केले...तसेच उपस्थित गावातील विध्यार्थीवर्गाने सुद्धा क्रांतिवीर खाज्या नाईक, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आपले भाषण स्थानिक,हिंदी,इंग्लिश,मराठी भाषेत व्यक्त केले...

 त्यात गावातील युवक मंगेश पावरा यांनी दारूबंदी आणि शिक्षण याबद्दल आदिवासी गीत गायले.....या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदू शिंदे आणि यांनी केले.... तर आभार प्रदर्शन करतांना चेतन पावरा यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, गावातील ग्रामस्थ तसेच तरुणांनी अशा समाजप्रबोधन कार्यात सहभाग नोंदवावा तसेच, तरुणांनी कायद्याविषयी माहिती करून घेऊन त्याप्रमाणे वाटचाल केले तर आपल्या सामाजिक, शैक्षणिक अडचणीला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होतो,आणि त्याप्रमाणे तरुणांनी आपली वाटचाल करावी असे आवाहन केले......आणि त्यांनी आभार प्रदर्शन मांडले.......

कार्यक्रमात सरशेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला...

कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी शारदाई फाऊंडेशन,तसेच आदिवासी नवनिर्माण सेना उमराणी बु! तसेच आदिवासी एकता परिषद उमराणी बु!खु! येथील कार्यकर्त्यांनी सहकार्य केले....या कार्यक्रमप्रसंगी गावातील,तालुक्यातील,बहुसंख्य जेष्ठ लोक,आणि गावकरी,समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.......

Post a Comment

1 Comments