शारदाई फॉउन्डेशन उमराणी बु॥ ता. अक्राणी जि. नंदुरबार व महिला आर्थिक विकास महामंडळ - अक्कराणी-तोरणा- जागृती धडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी महिलांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला..
कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित महिलांच्या हस्ताने आदिवासी कुलदैवत याहा मोगी माता पुजन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन आणि उद्घाटन करून रँलीची सुरवात करण्यात आली...
रँलीची सुरवात मुलीच्या हॉस्टेल जवळून एकलव्य चौक - बाबा चौक -वीर खाज्या नाईक चौक - होळी चौक व पारशीनगर येथे कार्यक्रम स्थळ पर्यंत संपन्न झाली.. कार्यक्रमाची सुरवात आदिवासी स्वागत गीताने झाली व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती. मीनाताई पावरा यांच्या हस्ते कार्यक्रम स्थळी उद्घाटन करण्यात आले...
यावेळी उपस्थित जि.प. मराठी शाळा धडगांव येथील विध्यार्थीनीच्या हस्ते उपस्थित प्रमुख पाहुण्यांना श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला....
कार्यक्रमाची प्रस्तावना शारदाई फॉउन्डेशनचे उपाध्यक्ष श्रीमती. वर्षा प्रकाश वळवी यांनी मांडली...
यावेळी उपस्थित मराठी शाळेतील विध्यार्थीनीनी आपले मनोगत व्यक्त केले....तसेच उपस्थित पाहुणे श्री. तुकाराम पावरा- यांनी महिलाना स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यासाठी स्रिच्या अंतरमनातून येणारा आत्मविश्वास, आणि धाडस हे तिला पाठबळ देत आहेत असे मनोगत व्यक्त केले...
यावेळी श्रीमती. ज्योती राजु पावरा यांनी आपल्या स्थानिक भाषेत महिलांना प्रेरणागीत सहित समाजात आज स्त्री राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहित्य, कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रात मुक्तपणे संचार करत आहे. तीच्या पाऊलखुणा, पदचिन्ह विविध ठिकाणी उमटत आहेत. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत स्त्रीयांनी समाजातील आपले स्थान निर्माण केले आहे असे म्हटले....
यावेळी जि.प.मराठी शाळेतील शिक्षिका श्रीमती. शकुंतला ढोलार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की घरातील एक माता शिकुन शहाणी झाली तर, सर्व कुटूंब शहाणे होईल, सगळ्या स्त्रीया शिकल्या की, सर्व देश जागा होईल. असा विचार करुनच महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचे कार्य हाती घेतले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत भारतच नव्हे तर महाराष्ट्र देखील अग्रेसर राहीला आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला....या शिक्षणाचा माध्यमाने महिलांना पुढे जाण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे आणि आज महिलांनी ही उच्च पदी - राजकीय-सामाजिक-आर्थिक-क्रिडात आपले नाव सवर्ण अक्षरांनी कोरले आहे असे मनोगत व्यक्त केले...तसेच यावेळी शारदाई फॉउन्डेशनचे मार्गदर्शक तसेच जिपिडीपी चे ट्रेनर रोशनीताई पाडवी यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना म्हटले स्त्रियांचे सबलीकरण होणे म्हणजे तिचे व्यक्तिमत्व एक माणूस म्हणून विकसित करायचे व तिला तशी संधी मिळवून द्यायची. महिलांना कोणत्याही भेदभावाशिवाय प्रगती करण्याची संधी द्ययला हवी. कारण, प्रत्येक वेळी ती अबला आहे तसेच तिला काही कळत नाही, ती सक्षम नाही, पुरुषांच्या तुलनेत ती काम करण्यास सक्षम नाही. असे म्हटले जाते. तसेच विविध जातीधर्माच्या स्त्रियांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. स्त्रियांच्या अंगी असणारी सहनशक्ती, संयम या गुणांमुळे तिला प्रत्येक वेळी गृहित धरले जाते, परंतु आता परिस्तिथी बदललेली दिसुन येत आहे स्वतंत्रच्या लढाई पासुनच महिलांचा सहभाग दिसुन आला आहे कोणतेही क्षेत्र असो महिलांचे योगदानही असते..आज खेळ-संगीत-आदि अनेक क्षेत्रांमध्ये महिला उल्लेखनीय कामगिरी करत आहे असे वक्तव्यातुन महिलाना मार्गदर्शन केले....तसेच कार्यक्रमात उपस्थित पाहुणे आदिवासी एकता परिषदचे के.के.पावरा- श्री. एल. व्ही. पावरा- आ.युवा अध्यक्ष राकेश पावरा- शारदाई फॉउन्डेशनचे सचिव श्रीमती.शारदा पावरा - सहसचिव निमा पावरा- सभासद रोहिदास पावरा - सभासद शामसिंग पावरा- सरदार पावरा -रुपसिंग पावरा - श्रीमती. शकुंतला पराडके - नगरसेविका श्रीमती. उषाताई ढोलार आदि उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मावीमच्या अक्काराणी व तोरणा व जागृती चे व्यवस्थापक श्रीमती. रमीलाताई वसावे - सुरेखाताई गावित-फॉउन्डेशनचे कार्यकर्ता जगदिश एस.पावरा-अजय पावरा-कपिल पावरा- रवींद्र पावरा- अनिल जे.पावरा- रामदास पावरा आदींनी परिश्रम घेतले...मावीम जागृतीचे व्यवस्थापक श्री.राजु पराडके यांनी सुत्रसंचालन केले. शारदाई फॉउन्डेशनचे अध्यक्ष श्री. जगदिश एल. पावरा यांनी आभार व्यक्त करतांना म्हटले की बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, माता ह्या भूमिकांव्यतिरिक्त अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, खेळाळु, डॉक्टर- वकिल अशा अनेक रूपांनी आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत. आणि त्यांना अधिक चमक तिने आपल्या कर्तृत्वाने दिली आहे. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर असे वाटते की महिलांना त्यांची जागा मिळाली आहे असे म्हणत अध्यक्षच्या वतीने आभार व्यक्त केले...
कार्यक्रमानंतर संगीत खुर्ची व लिंबु चमचा स्पर्धा खेळण्यात आली तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आदिवासी ढोल वाद्य संगीतवर नुत्य करून आनंद व्यक्त करण्यात आले....
नमस्कार मित्रहो....
मी एक सामान्य वाचक तसेच लिखाणाची आवड असलेला रसिकगण....
लेखन प्रेमी,वाचन प्रेमी,पुस्तक प्रेमी,सिनेमा प्रेमी
कधी कागदावरचं मनात उतरवतो..
तर कधी मनातलं कागदावर...
खूप अलंकारिक माझं लिखाण नसतं...
माझा कल समोरच्याला आपले विचार पटवून देण्यात असतो....
प्रासंगिक आणि काल्पनिक लिखाणाची शैली...
कधी कविता तर कधी चारोळी कधी वैचारिक उपरोधिक लेख लिहतो...
माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत.......
आपल्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा..
0 Comments