जि.प.शाळा काल्लेखेतपाडा (उमराणी बु) इ.१ली वर्ग शुभारंभ१ मार्च २०१९ वर्ष ३ रे
आज दि. १ मार्च रोजी सन २०१९ च्या इयत्ता पहिली वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास मा.श्री.दोडेसाहेब (गटशिक्षणाधिकारी प.स.धडगाव), मा.श्री.चौरेसाहेब (विस्तार अधिकारी), मा.श्री.राजपुतसाहेब ( विस्तार अधिकारी), सौ.आशाताई पावरा(सरपंच उमराणी बु), सौ.शारदाई पावरा ( सचिव शारदाई फॉऊंडेशन उमराणी), मा.रामदास पावरा (उपाध्यक्ष शा.व्य.समिती), पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नविन दाखल होणा-या विद्यार्थींचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. मा. श्री. दोडेसाहेबांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, १ मार्च ला इयत्ता पहिलीचा वर्ग शुभारंभ केल्याने नविन विद्यार्थी मधील शाळेबद्दल असलेली भीती नाहीशी होईल व नविन विद्यार्थींची शाळापुर्व तयारी याच सत्रात झाल्यामुळे गुणवत्ता वाढीस मदत होईल तसेच या नाविन्यपुर्ण उपक्रमाबद्दल शिक्षकांचे कौतुक करुन शिक्षण विभागातर्फे शुभेच्छा दिल्या. मा.श्री.चौरेसाहेबांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाचन लेखन तसेच गणितामधील नवनवीन स्ट्रीक्स मनोरंजनात्मकरीत्या समजावुन दिल्या. मा.श्री.राजपुतसाहेबांनी शाळेने केंद्रस्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक करुन यशस्वी खेळाडूंचा सत्कार केला. सौ.आशाताई पावरा व सौ. शारदाताई पावरा यांनी शाळेला आवश्यक ती मदत करु असे आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या तसेच श्री.जेलसिंग जहांगीर पावरा (काल्लेखेतपाडा)यांनी तात्पुरत्या स्वरुपात आपले स्वत:चे घर शाळेला वर्ग भरवण्यासाठी दिल्याबद्दल त्यांच्या मातोश्रींचा शिक्षण विभाग प.स.धडगाव मार्फत सत्कार करण्यात आला.
नमस्कार मित्रहो....
मी एक सामान्य वाचक तसेच लिखाणाची आवड असलेला रसिकगण....
लेखन प्रेमी,वाचन प्रेमी,पुस्तक प्रेमी,सिनेमा प्रेमी
कधी कागदावरचं मनात उतरवतो..
तर कधी मनातलं कागदावर...
खूप अलंकारिक माझं लिखाण नसतं...
माझा कल समोरच्याला आपले विचार पटवून देण्यात असतो....
प्रासंगिक आणि काल्पनिक लिखाणाची शैली...
कधी कविता तर कधी चारोळी कधी वैचारिक उपरोधिक लेख लिहतो...
माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत.......
आपल्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा..
0 Comments