The market will soon be available to the coin ₹20 बाजारात लवकरच 20 रुपयांची नोट येणार

बाजारात लवकरच 20 रुपयांची नोट येणार 



 भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच 20 रुपयांची नवी नोट बाजारात घेऊन येत आहे. 


या नवीन नोटेवर गव्हर्नर शक्तीकांत दास यांची सही असणार आहे. दरम्यान 20 रुपयाच्या सध्या चलनात असलेल्या नोटांचा देखील वापर कायम राहणार आहे, अशी घोषणा रिझर्व बँकेने केली आहे.

जाणून घ्या नव्या नोटेविषयी:


▪ 20 रुपयांची ही नवी नोट हिरवट पिवळ्या रंगाची असेल.
▪ नोटेच्या पाठीमागे वेरुळ लेण्यांचे छायाचित्र असणार
▪ 63 मिमी लांब आणि 129 मिमी रुंद या नोटेचा आकार असणार आहे
▪ नोटेच्या समोरच्या भागावर रोमन आणि देवनागरी लिपीमध्ये आकडे
▪ नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचे छायाचित्र असणार
▪ आरबीआय, भारत, इंडिया आणि 20 ही नावे नोटेवर लिहिलेली असणार


गेल्या दोन-तीन वर्षांत आरबीआयने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटांसह 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 10 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत.


Post a Comment

0 Comments