चारही टप्प्यातील निवडणूकीतील मतदानाच वैशिष्ट्यNandurbar,Gadchiroli,

चारही टप्प्यातील निवडणूकीतील मतदानाच वैशिष्ट्य

सर्वात जास्त मतदान टक्केवारी  - गडचिरोली-चिमुर

सर्वात कमी मतदान टक्केवारी - पुणे

एकंदरित आदिवासी बहुल मतदारसंघात शहरी भागापेक्षा मतदानासाठी ऊत्स्फुर्त सहभाग

ऐशोआरामी राहाणीमान, चोवीस तास वीज पाणी व ईतर सुविधा, चकाचक रस्ते, वैद्यकीय सोयी उपभोगणारा शहरी मतदार राष्ट्रीय कर्तव्य विसरला.

सुट्टी उपभोगली पण मतदानाला दांडी मारली

सोशल मेडीयावर राष्ट्रीय आंतराष्ट्रिय राजकारणावर बेंबीच्या देठापासुन मत मांडणारा शहरी मतदार सोईस्कर रित्या बाजुला राहिला

याउलट किमान पायाभूत सुविधांची वानवा सहन करणारा, सोशल मेडीयापासुन लांब असणारा कायम मागास आदिवासी म्हणून हिनवला गेलेला पण एक दिवसाचा रोजगार बुडवुन आवर्जुन मतदान करणारा गडचीरोली, भंडारा गोंदिया, नंदुरबार, पालघर या आदिवासीबहुल भागातील मतदार
२१ व्या शतकातील भारताचे हे परस्परविरोधाभासी चित्र

आदिवासी भागातील विज व पाणीपुरवठ्याच लोडशेडींग शहरी भागात समसमान विभागून द्यावं....

शहरात टॉयलेटच्या एका फ्लशने जेवढं पाणी वाया जातं तेवढंच पाणी निव्वळ पिण्यासाठी आणायला दहा-पंधरा वयाच्या पोरांना किमान दिड  किलोमीटरच्या दहा फे-या माराव्या लागतात. सिंचन प्रकल्पासाठी भुसंपादनातुन विस्थापन व पुर्नवसन च्या वेदना गुमान सहन करतात बिचारे पण मतदानाचा टक्का मात्र घसरु देत नाहीत. काय पराकोटीचा विरोधाभास हा?!

 व्हाट्सॲपवर फक्त लंगोट परिधान केलेला मध्यमवयी अर्थातच मुलनिवासी मतदाराचा मतदान करतानाचा फोटो पाहिला. सत्तर वर्षात काय दिलं लोकशाहीने त्याला? किंवा लोकशाहीकडून अपेक्षा तरी काय असावी त्याला? कपडे, निवारा, दोन वेळचं अन्न नेमकं काय? अर्थातच यातल काही नाही. ऊलट मतदानाच कर्तव्य जबाबदारीने बजवायला आला होता तो. सदरचा फोटो मतदान न करणा-या शहरी मतदाराच्या कानशिलात सनसनीत चपराक भासावी.


                                                                            एक सुसुक्षित आदिवासी मतदार 

Post a Comment

0 Comments