सातपुड्यातील आश्रमशाळा: चालु की बंद? विद्यार्थी-शिक्षक व शिक्षणाचा थांगपत्ता नसलेले सातपुड्यातील आदिवासी शिक्षण....!
(भाग १)
- अॅड. कैलास वसावे, मोलगी
मानव विकास निर्देशांक अहवात महाराष्ट्रात सर्वात खालचा नंदुरबार जिल्हा. आदिवासी जिल्हा...!
आणि नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचा विकास न होण्याची पाळे-मुळे सातपुड्यात मिळणा-या दर्जाहिन शिक्षणात आहे, हे येथील जळजळीत वास्तव!* सातपुड्यातल्या प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण हे सरकार भरोसे होते व सरकारचा कारभार मात्र कागदावर 'राम भरोसे' चालतो हे ही तेवढंच सत्य. म्हणुन तर गुजरातला सर्वांत जास्त अकुशल मजुर पुरवणारा नंदुरबार हा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यातला आदिवासी कुठं व कसा शिकतो हा संशोधनाचा विषय आहे.
*शाळा सुरु झाल्या १७ जुनला..! परंतु सातपुड्यातल्या शाळांची दारं उघडायला मात्र जुलै पर्यंतही मुहुर्त लाभला नाहीये.* १ जुलै, २०१९ रोजी सोमवारी ५०० च्या वर आदिवासी विद्यार्थी शिकत असलेल्या भांग्रापाणी ता. अक्कलकुवा येथील शाळेला आम्ही भेट दिली. शाळा चालु होऊन तिसरा आठवडा चालु झाला तरी शाळेचं दार मात्र बंद होतं. शाळेत रोजंदारीवर काम करणार ज्युनिअर'ला(प्राध्यापक) शिकणारे युवा तेवढेच बसुन होते. एकुण ४० कर्मचारी असलेल्या या शाळेत फक्त दोन कर्मचारी उपस्थित होते. आणि हे जे ३८ दांडीबहाद्दर कर्मचारी आहेत ते शाळा सुरु झाल्यापासुन अद्यापपर्यंत उगवले नाहीत. *परंतु त्यांचा पगार चालु राहिल, त्यांची मस्टर'वर हजर असतील पण शाळेत मात्र राहणार नाही. विषेश म्हणजे १ ली ते १२ वी (१२ वी विज्ञान-कला) पर्यत वर्ग असलेल्या या शाळेत एकही विद्यार्थी शाळेत नव्हता. कारण काय तर पाण्याची सोय नाही म्हणुन सामान घेऊन आलेल्या मुलांना 'आम्ही सांगु तेव्हा या' म्हणत हाकलुन लावलेलं.*
हेच नव्हे तर ३० जुन रोजी देवमोगरा पुनर्वसन, ता. अक्कलकुवा येथील १ ली ते १२ वी पर्यतच्या शाळेत मोजुन फक्त १२ मुलं होती. यातले ५ मुले जी १२ वी ला होती ती २४ तारखेपासुन आलेली. पण मास्तर नसल्याने फक्त दोन वेळ पिवळा भात खाऊन दिवस ढकलत होती. मुलीं शाळेवर आलेल्या पण निवासाची सोय नाही म्हणुन घरी परत पाठवुन दिल्या. त्याचदिवशी दाब ता. अक्कलकुवा येथील शाळेला भेट दिली. फक्त ८-९ मुलंच काय ती उपस्थित. सरी ता. अक्कलकुवा येथील शाळेतही रविवारी फक्त १५-२० मुलं होती. बाकी बर्डी, वडफळी, होराफळी व इतर तालुक्यातील शाळेतही मुलं नव्हतीच. १ जुलै च्या सोमवार पासुन मुलं शाळेत दाखल होताहेत. मास्तर केव्हा येतील याचा काहीच थांगपत्ता नाही.
*परंतु या शाळेतील मास्तर मस्टरवर शाळा चालु झाल्यापासुन सह्या हाणतील व फुकटचा पगार ढापतील. तेच काय हे मास्तर पहिल्या दिवसांपासुन १००% मुलं हजर होतील हे दाखवुन मुलांच्या नावाने रोजच्या जेवणाचे धान्य विकुन खातील. त्यात पुढारी व अधिका-याचे वाटे पडतील.* पण हे नेहमीचच..! *सातपुड्यातील आश्रमशाळा ह्या शैक्षणिक वर्षातील निम्मे दिवस शाळा बंद ठेवण्यात माहिर आहेत. आता शाळा सुरवातीला १५ दिवस शाळा बंद. मग बैलपोळा सुट्टीला १५ दिवस शाळा बंद राहतील. दिवाळी तर आश्रमशाळेसाठी जास्तच साजरी होईल. २० दिवस सरकारी सुट्टी व १५-२० दिवस पुन्हा शाळा बंद. आणि जशी १२ वी ची परिक्षा सुरु झाली की अख्ख्या शाळेचे शिक्षक पोरांना काॅप्या पुरवायला केंद्रावर आणि मुलं होळीसाठी पुर्ण मार्च महिनाभर गावी. मग एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वार्षिक परिक्षा संपवुन जो शाळा बंद होतील त्या डायरेक्ट आताच्या जुलै'ला सुरु होतील.* ही अतिशयोक्ती नव्हे तर दाहक वास्तव आहे.
यात शाळाभेटी दरम्यान जी भयानक वस्तुस्थिती आढळली ती पाहता मग शासन नावाचं 'शेंबडं प्रशासन' करते तरी काय हाच प्रश्न आहे. *पुढारी, नोकरदार, व्यापारी व थोड्या सुधरलेल्या आदिवासींची मुलं टेम्पो भरुन सातपुड्याबाहेर "नामांकित इंग्रजी माध्यमा'च्या शाळेत, एकलव्य रेसिडेन्शियल स्कुल'ला जातात. आणि गरिब, अडाणी व रोजच्या जेवणासाठी मारामार असलेल्या लंगट्या आदिवासींची मुलं या भयाण व गोठ्याच्या इमारतीत पिवळा भात खायला जातात.* ही प्रतवारी सातपुड्यातील आदिवासींच्या शिक्षणाची आहे. *आणि बहुतेक ज्या सोयी-सुविधा व सवलती-योजना आहेत त्याही ह्या पुढारी व सुधरलेल्या आदिवासींकडे जातात..! गरिब न निराधार आदिवासींची मुले मात्र असल्या फालतुच्या आश्रमशाळेत मरतात. आणि त्या विद्यार्थ्यांचे पालक गुजरातमधे..!
(क्रमश.....)
- अॅड. कैलास वसावे, मोलगी
युवाध्यक्ष, आदिवासी एकता परिषद, भारत.
9405372708.
( ही सातपुड्यातील आदिवासींच्या शिक्षणावरची लेख मालिका आहे. मन सुन्न करणारी विषण्ण परिस्थिती या आश्रमशाळा व आदिवासींची आहे. सदर लेखन प्रत्यक्ष शाळाभेटीतुन आलेल्या भयानक वास्तवाचे दाहक चित्रण याव्दारे प्रयेक जागरुक आदिवासीपर्यंत पोहचविण्याचे ध्येय आहे. )

0 Comments