उमराणी बु! काल्लेखेत पाडा येथे चिमुकल्यानी केले श्रमदान

शारदाई फॉउन्डेशन व जि.प.शाळा काल्लेखेतपाडा येथिल चिमुकल्या विद्यार्थांचा श्रमदानात सहभाग......धडगाव - शारदाई फॉउन्डेशन उमराणी ब्रुद्रुक व जि .प .शाळा काल्लेखेतपाडा शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड या उपक्रमासाठी शाळा सुरू झाल्या दिवशी फाउंडेशन व जि. प.शाळाच्या वतीने वृक्षदिंडीच्या माध्यमाने जनजागृती करण्यात आली होती व एक मुलं एक झाडं हा संकल्प करण्यात आला , तो संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागेल हा द्रुष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवुन  जि .प .शाळेतील विध्यार्थी जिद्द व चिकाटीने श्रमदान करण्यासाठी तयार झाले व प्रत्यक्ष कृती करून १००० खड्डे खोदून दाखवून ही दिले.. या वृक्ष लागवड साठी श्रमदान मधुन खड्डे खोदण्यासाठी  गावात मीटिंग घेण्यात आली परंतु प्रत्यक्ष कृती करण्यासाठी ग्रामस्थ व युवावर्ग उपस्थित राहिला नाही .... ही खुप लाजिरवाणी गोष्ट आहे.चिमुकल्या विद्यार्थाचा उत्साह पाहुन मन खरंच भारावून गेले ..... पुन्हा त्यांच्यातील श्रमदान करण्याचा उत्साह पाहुन ठरवण्यात आले त्यासाठी शारदाई फॉउन्डेशन व जि .प .शाळेतील विध्यार्थांच्या सहकार्याने पुन्हा नव्याने एक दिवस श्रमदान करण्यात येणार असुन येत्या शनिवारी त्यांच ठिकाणी वनक्षेत्र हद्दीत श्रमदान करण्यात येणार असुन समस्त गावकरी मंडळी तसेच युवा वर्ग , ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य व गावातील सर्व पाड्यातील ग्रामस्थ....यांना   फॉउन्डेशनचे अध्यक्ष जगदिश पावरा व जि .प .शाळा काल्लेखेतपाडा येथिल चिमुकल्या विद्यार्थांकडुन एक दिवस गावविकासासाठी देण्यात यावा अशी विनंती करण्यात येत आहे .....तसेच सातपुड्यातील जनतेनेही शासनाच्या १३                        कोटी वृक्ष लागवड योजनेत सहभागी होण्यास तयार व्हा....

असे आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्याकडील उपलब्ध असलेल्या जागेवर जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुन हा १३ कोटी वृक्ष लागवड संकल्प यशस्वी करावा.....उपक्रमात सहभागी झालेले संतोष पावरा , मुख्याद्यापक रुपेशकुमार नागलगावे, दिनकर पावरा सर , तेगा पावरा सर , रामदास पावरा , पंडित पावरा , वेसाण्या पावरा , सापा पावरा , दोहाण्या पावरा , राजु पावरा यांच्या सहकार्याने श्रमदान करण्यात आले ...

aniljp.blogspot.com 

Post a Comment

0 Comments