शारदाई फाऊंडेशन Team Work काल्लेखेतपाडा

नंदुरबार - धडगाव तालुक्यातील उमराणी बुद्रुक येथील जि. प. शाळा काल्लेखेतपाडा येथे शारदाई फाॅउन्डेशन च्या वतीने वृक्षदिंडी कार्यक्रम घेण्यात आला ..कार्यक्रम अध्यक्षस्थानी श्रीमती. आशाबाई पावरा (सरपंच).... तसेच उपस्थित मान्यवर फॉउन्डेशनचे सचिव श्रीमती. शारदाबाई पावरा, फॉउन्डेशनचे अध्यक्ष जगदीश पावरा,ग्रामपंचायत चे सदस्य तेरसिंग पावरा, अनिल पावरा, संतोष पावरा, नटवर पावरा, रामदास पावरा, ग्रामस्थ उपस्थित होते... कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी पारंपारिक वाद्य ढोल, मांदल वाजवून वृक्षदिंडी रॅली काढण्यात आली व झाडे लावा झाडे जगवा, एक मुल एक झाड अश्या घोषणा देत घरोघरी जाऊन वृक्ष लागवड बद्दल जनजागृती करण्यात आली...व नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले.. फॉउन्डेशनचे अध्यक्ष श्री. जगदिश पावरा यांनी ग्रामस्थांना मनोगत व्यक्त करताना म्हटले वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने जमिनीची धूप होत आहे. अवेळी पावसाचे आगमन वातावरणातील प्राणवायू संपुष्टात येत आहे.आजकालचे वाढते तापमान, उष्माघात सारखे प्राणघातक समस्या , दुष्काळग्रस्त सारख्या मोठ्याप्रमाणात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या , पाणीटंचाई याची झळ यासारख्या विविध मोठमोठ्या समस्या, भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून रोपाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे. यावेळी फॉउन्डेशन व ग्रामस्थच्या वतीने शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड या उपक्रमात सहभागी होऊन वनक्षेत्र जमिन, शेतातील बांध, पडीक जमीन इतर ठिकाणी श्रमदान करुन झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे सांगितले.....


तसेच यावेळी उपस्थित समाजिक कार्यकर्ते अनिल पावरा यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले  प्रत्येक गावागावात झाडं लावणं, झाडं जगवणं, झाडांचं संगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर येणाऱ्या काळात आपल्याला गंभीर समस्याचा सामना करावा लागणार आहे.. म्हणूनच आता प्रत्येकाला आपल्या पृथ्वीवरील होणाऱ्या विनाश थांबवण्यासाठी पर्याय म्हणून झाडे लावा झाडे जगवा हे करण्याशिवाय आता आपल्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही, याची सर्वाना जाणीव होऊ लागली आहे; पण या जाणिवेला प्रत्यक्ष- नियोजन बध्द कृतीची, आणि दृढ इच्छाशक्तीची जोड हवी.....
👉🏼 कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. रूपेशकुमार नागलगावे ( मुख्याध्यापक ), तेगा पावरा ( सह शिक्षक ), रामदास पावरा,
आभार - दिनकर पावरा उपशिक्षक
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
   झाडे लावा झाडे जगवा
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Post a Comment

0 Comments