MPSCआणि UPSC साठी कोणता क्लास लावू???

🎯MPSC - UPSC🎯 साठी कोणता क्लास लावू ?

नमस्कार मित्रांनो,लेखाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट सांगतो की,मी कोणतत्याही क्लासचा समर्थक किंवा विरोधक नाही.त्यामुळे माझ्या लेखात येणाऱ्या मुद्द्यांचा विद्यार्थी स्वतः विचार करतील आणि निर्णय घेतील मी फक्त वाटाड्याच काम करत आहे.

ह्या लेख ग्रामीण भागातून आलेल्या गरजु आणि गरिब विद्यार्थ्यांसाठी आहे.घरच्यांचे स्टेट्स दाखविण्यासाठी किंवा पैशाची उधळपट्टी करणाऱ्यांसाठी नाही ह्याची नोंद घ्यावी.

👉मित्रांनो कोणताही क्लास लावण्याअगोदर खालील मुद्द्यांचा जरूर विचार करा आणि मगच क्लास लावा.

1)कोणाच्यातरी सांगण्यावरून तुम्ही क्लास लावत असाल तर जरा थांबा.क्लास केल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही हा भ्रम मनातून काढून टाका.महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनेक अधिकारी हे क्लास न करता देखील झालेले आहेत.(मी क्लास म्हणतोय.मार्गदर्शन आणि क्लास यात गफलत करू नका.)

2)पोस्टरबाजी करणाऱ्या क्लास पासून सावधानता बाळगा.दर्जा असणाऱ्या क्लासला पोस्टरबाजी करायची गरज पडत नाही.

3) निवड झालेल्या ‘गुणवंत’ विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात 100% सगळं खरंच असतं असे काही नाही.बऱ्याच वेळा वेळ मारून नेण्यासाठी काही गोष्टी अवास्तवपणे सांगितल्या जातात.(काही जण मात्र आपलं प्रामाणिक मत देतात)

4)साधारणपणे ग्रामीण भागातील विद्यार्थी क्लास लावण्यासाठी क्लासची चौकशी एखाद्या नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांकडे करतो.या गोष्टीचा फायदा काही क्लासवाल्यांनी घेतला.संबंधित अधिकाऱ्याकडून एखादे ऍडमिशन आले कि त्या अधिकाऱ्याला टक्केवारी देण्याचे प्रकार सध्या घडत आहे. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवताना स्वतः त्या क्लासची चौकशी करा.

5)बहुतेक क्लासचे संचालक हे प्रशासनातील अधिकारी आहेत किंवा होते.अर्थात हि मंडळी हुशार आहे पण ती व्यक्ती हुशार आहे म्हटल्यावर त्या व्यक्तीचा क्लास चांगलाच असेल अस काही नाही.त्यामुळे कोणाचे नाव पद यावर विश्वास ठेऊन क्लास निवडू नका.
*क्लास लावताना विद्यार्थ्यांनी करावयाच्या गोष्टी*

1) कोणताही क्लास लावण्याअगोदर स्वतः आयोगाचा अभ्यासक्रम बघा.आता इंटरनेटवर पुस्तकांची यादी उपलब्ध आहे.अभ्यासक्रम, पुस्तक यांची विभागणी करा.सोपा,अवघड विषयांचे स्वतः मूल्यमापन करा.अवघड विषयांचाच क्लास लावा.(आता प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र क्लास सुरु झाले आहेत.) संपूर्ण इंडिग्रेटड क्लासची फी भरायची गरज नाही.तेवढेच आपले पैसे वाचतील.

2) कोणत्याही क्लासचा पूर्वग्रह दूषित करून घेऊ नका.हा क्लास चांगला आहे ,हा क्लास वाईट आहे.

3) क्लासमध्ये चौकशी करण्यासाठी मित्रमंडळी किंवा नातेवाईकांना पाठवू नका.ते फक्त औचारिकता पूर्ण करतील.ऍडमिशन नंतर मनस्ताप तुम्हाला करुन घ्यावा लागेल.

4)तुम्हाला ज्या क्लास बद्दल सांगण्यात आले आहे किंवा जेथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे आहे.त्या क्लासच्या संचालकांना भेटायचा प्रयत्न करा.भेट झाली तर तुमच्या शंका बिंदास्त विचारा.जर संचालक तुम्हाला भेटत नसतील.मग विचार करा कि आपण खरच तेथे ऍडमिशन घ्यायला पाहिजे का?

5)ज्या सरांच्या नावावर क्लास चालतो आहे ते सर स्वतःक्लासमध्ये किती शिकवतात कि फक्त पाहुण्यासारखं आठवड्यातून 1-2 येतात.हे बघा.

6)क्लासमध्ये कोणते शिक्षक कोणते विषय शिकवतात.त्यांची नावे आपल्याकडे घ्या.आपल्या ओळखीच्या किंवा त्या क्लासच्या जुन्या विद्यार्थ्यांकडून संबंधित शिक्षकाच्या शिकविण्याविषयी चौकशी करा.क्लास मध्ये सांगितलेली माहिती आणि जुन्या विद्यार्थ्यांकडून मिळालेली माहिती यात तफावत आढळली तर अश्या क्लासला ऍडमिशन घेऊ नका.

7)क्लासमध्ये वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कोणकोणते उपक्रम राबविले जातात.याची चौकशी करा.

8)क्लास चे वेळापत्रक जाणून घ्या.त्यानुसार आपले स्वतःचे वेळापत्रक बनवा.

9)क्लासच्या विषय शिक्षकांना जरूर भेटा.

10) एकदा विषय प्रशासनातील अधिकारी शिकवत असेल तर ते अधिकारी परिपूर्णच असतील किंवा तो विषय परिपूर्ण होईल या भ्रमात राहू नका.कामाच्या व्यापात किंवा प्रशासकीय धावपळीत काही मुद्दे सांगायचे राहून जाऊ शकतात.त्यामुळे स्वतः त्या विषयावर अधिक भर द्या.

11) नियमितपणे टेस्ट सिरीज होते कि नाही याची चौकशी करा.क्लासच्या जुन्या टेस्ट सिरीज पेपरची मागणी करा.

12)क्लासच्या नोट्स मिळाल्या तर सिनियर्स कडून पडताळून घ्या.

13) या व्यतिरिक्त तुमच्या आणखी काही शंका ,फी च्या अडचणी असतील तर संबंधित क्लास संचालकांशी चर्चा करा.

14) सर्वात शेवटी आपल्याला क्लास लावायची गरज आहे का हे एकदा स्वतःच्या मनाला विचारा. उगाच मित्राने क्लास लावला आहे म्हणून मी लावणार अस असेल तर स्वतःची फसवणूक करू नका.

या लेखाने तुम्हाला क्लास लावताना नक्की फायदा होईल.या लेखामुळे कोणाला त्रास झाला असेल तर पाय धरून माफी मागतो.
धन्यवाद।

Post a Comment

0 Comments