उमराणी बु! श्रमदानातून बांधला गावात पहिला वनराई बंधारा

श्रमदानातुन बांधला गावात  पहिला वनराई बंधारा


दिनांक 17-11_2018



ता.धडगांव .. मौजे उमराणी ब्रु॥ येथील आदिवासी युवा एकता परिषदचे कार्यकर्ता यांच्या समोर गावातील पाणी टंचाई निराकरण करण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणुन 'पाणी अडवा...पाणी जिरवा' हा  उपक्रम व जलसंधारणासाठी ग्रामस्थ व युवा वर्गाच्या मदतीने वनराई बांधण्यात आले. त्यानुसार उमराणी खु येथील नदी 20 फुट  लांबीचा व 2 फुट उंचीचा सिमेंट पिशव्या माती भरुन बंधारा घातला.गावातील युवा वर्गानी या उपक्रमातुन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. आदिवासी नवनिर्माण सेना व आदिवासी युवा एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा वनराई बंधारा बांधण्यात आला. या वनराई बंधा-यात साठलेल्या पाण्यामुळे चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना लाभ होवुन पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे व जनावर साठी पिण्याची व्यवस्था होईल या उद्देशाने या बंधाऱ्याच्या काम करण्यात आले...  गावातील चेतन पावरा यांच्या पुढाकाराने हा बंधारा बांधण्यात आला़ या बांधण्यासाठी लागणाऱ्या रिकाम्या सिमेंट पिशव्या व इतर साहित्य युवा वर्गानी उपलब्ध केले. तीन थर माती पिशव्या भरून हा बंधारा बांधण्यात आला़ सुमारे 100 पिशव्या या बंधाऱ्यासाठी वापरण्यात आल्या़ उमराणी गावात हा पहिला वनराई बंधारा बांधण्यात आला आहे़ या अभिनव उपक्रमाचे  ग्रामस्थांनी कौतुक केले आहे़.समाजातील विविध घटकांनी भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी गावात जाण्यासाठी मुख्य रस्ता नाल्यातुन जातो परंतु आज देखील फरशी पुल बांधण्यात आले नाही व गावातील लोकांना येण्या-जाण्यासाठी वाहन नाल्यामधुन काढावी लागते रस्त्यावर डबके साचत असतांना वाहन धारकांना वाहन काढण्यासाठी खूप कसरत करावी लागत होती. रस्त्यावरील पाणी साचू नये म्हणुन रस्त्याच्या वरच्या ठिकाणी वनराई बंधाऱ्याचे काम करण्यात आले आहे... व ग्रामस्थकडुन प्रशासनानी याची दखल घ्यायला पाहिजे व फरशीपुल चा निर्माण करून देण्यात यावी ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे..  सहभागी ग्रामस्थ व युवा वर्ग अन्य प्रा.बटेसिंग पावरा, राजू पावरा, विक्रम पावरा, राजेंद्र पावरा,दिलीप पावरा, अमर पावरा,वसंत पावरा, किसन पावरा,दिनेश पावरा, रामचंद्र पावरा,संजय पावरा, सुनील पावरा, हर्षल पावरा, संदीपपावरा,हेमंत पावरा, रितेश पावरा, नितीन पावरा, दिपक पावरा, कमलेश पावरा, पावरा, ईश्वर पावरा,कैलास पावरा, आदी युवकांनी वनराई बंधारासाठी परिश्रम घेतले..           

                 🙏🙏विशेष आभार शारदाई फाऊंडेशन अध्यक्ष जगदीश पावरा

    















Post a Comment

2 Comments