ध्यान साधना का करावी.....?
Why Meditation....?
सर्व फोटो स्त्रोत आंतरजाल
आपल्या जन्माच्या आधीपासुन मरे पर्यंत आपलं हृदय सतत कार्यरत असतं. हृदय दररोज़ ७००० लीटर रक्त पंप करते (यापैकी ७०% रक्त मेंदुला लागते आणि बाकी शरीराला ३०% रक्त मिळते) आणि ७०,००० किमी पेक्षाही लांब रक्तवाहीन्यांमधे प्रवाहीत करते. १ टन वजन ४२ फूट ऊंची पर्यंत उचलण्यासाठी जितकी शक्ति आवश्यक असते तितकी शक्ति हृदय त्याच्या कार्यातुन दररोज निर्माण करते.
आपण थकल्यावर आराम करतो पण हृदयाने जर ४ - ५ मिनीटं आराम केला तर आपला कायमचा आराम होऊन जाईल.
न थकता हृदय कसे काय बरे कार्य करत असेल?
हृदय सतत कार्य करू शकते कारण ते अनुशासनाच्या, DISCIPLINE च्या आधारावर कार्य करते. सामान्य NORMAL परिस्थितीमधे हृदय ०.३ सेकंद आकुंचन CONTRACTION होते म्हणजे PUMP करते आणि ०.५ सेकंद प्रसरण पावते किंवा आराम करते RELAX होते. या हिशोबाने ०.३ + ०.५ = ०.८ सेकंदात हृदयाचा एक ठोका BEAT पूर्ण होतो म्हणजे एका मिनीटात ७२ ठोके होतात जे सामान्य NORMAL असतात. आरामाच्या ०.५ सेकंदात अशुध्द रक्त फुफ्फुसात जाऊन १००% शुद्ध होऊन येते.
जर काही कारणाने शरीराला कमी वेळात जास्त रक्तपुरवठ्याची गरज DEMAND असेल तर हृदय जास्त रक्त PUMP करण्यासाठी आरामाची वेळ कमी करतं. अश्या परिस्थितीत आराम ०.४ सेकंद झाला तर हृदयाचा एक ठोका ०.७ सेकंदा त पूर्ण होऊन दर मिनीटाला ही संख्या ८२ च्या वर जाते आणि केवळ ८०%च रक्त शुध्द होतं.
जर आरामाची वेळ ०.३ सेकंद झाली तर ६०% च रक्त शुद्ध होते. म्हणजे अश्या घाईगर्दीच्या असामान्य स्थितीत,२०% किंवा ४०% अशुद्ध रक्त रक्तवाहीन्यांमधे PUMP केलं जातं आणि ती अशुद्धि रक्तवाहीन्यांमधे चिकटुन सामान्यपणे लवचिक ELASTIC स्वरूपाच्या असलेल्या रक्त वाहीन्या कठीण PLASTIC स्वरूपाच्या बनत जातात. कालांतराने रक्तवाहीन्या इतक्या कठीण बनतात कि रक्तात एखादी गाठ वाहत आली (कि पूर्वी धमनीच्या लवचिक स्वभावामुळे सहज निघुन जात असे) कि अडकुन रक्ताचा प्रवाह रोखते किंवा BLOCK करते - या स्थितिला हृदय विकाराचा झटका HEART ATTACK म्हणतात.
या हिशोबाने विचार केला तर लक्षात येईल कि हृदय विकाराचे मूळ कारण शरीराकडून किंवा मेंदुकडुन होणारी सामान्यपेक्षा वाढीव रक्ताची मागणी DEMAND हेच आहे. जेव्हा मेंदुची हालचाल ACTIVITY STIMULATE चलायमान होते तेव्हा त्याची रक्तपुरवठयाची मागणी सामान्यपेक्षा खूप वाढते. BRAIN ACTIVITY STIMULATE होण्यासाठी आपला आहार DIET केवळ २५% ते ३०%च जबाबदार आहे आणि ७०% ते ७५% आपले विचार, भावना, दृष्टिकोण, स्मृति जबाबदार आहेत.
त्यामुळे ज्यांना आपले हृदय दीर्घकाळ स्वस्थ ठेवायचे असेल तर त्यांनी चिंता, क्रोध, उदासी, घाईगर्दी (जल्दबाजी) आणि भावनात्मकदृष्टया संवेदनशिल SENSITIVE स्वभाव यांच्यापासुन स्वतःला सुरक्षित ठेवावे.
या पाच गोष्टींपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतेही औषध MEDICATION उपलब्ध नाही. त्यापासुन सुरक्षित रहाण्यासाठी ध्यानधारणा MEDITATION हाच एकमेव शाश्वत उपाय आहे.
म्हणुनच म्हंटलय -SPIRITUAL HEALING IS ONLY TRUE HEALING
This message is scientifically True.
स्वतः साठी एक तास वेळ द्या व आपले शारिरीक, मानसिक आरोग्य निरोगी ठेवा.
संकलित माहिती
साभार-सर्व फोटो स्त्रोत आंतरजाल
1 Comments
Nice information
ReplyDelete